परळीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंचं धडाकेबाज भाषण

 जर मध्यप्रदेश प्रमाणे लाडली बहन योजना आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर लोकं आपल्या दारात येवून आशीर्वाद देतील


विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी - पंकजाताई मुंडे


वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासह जिल्हयाच्या विकासाचे बीजारोपण पालकमंत्री असताना केले


परळीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात पंकजाताई मुंडेंचं धडाकेबाज भाषण


परळी वैजनाथ ।दिनांक ०५।

जिल्हयातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं ही आमची जबाबदारी आहे. मी पालकमंत्री असताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे बिजारोपण केले होते. वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा ही आपली मनापासूनची इच्छा होती आज हा विषय पुढे जात आहे याचा आनंद आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करू. वंचित, उपेक्षित व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोणत्याही व्यासपीठावर जायला पण तयार आहे असं प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज येथे केलं. 

       परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार ,कृषी मंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे आदींसह बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

         पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी जेव्हा आज मंचाकडे बघत होते, तेव्हा मला फार गरम होत होतं. मला वाटलं आत्ता डिसेंबरच्या महिन्यात एवढं गरम का होत आहे? मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस हे तिघंही परळीच्या या मंचावर आले आहेत. पण त्याहीपेक्षा इथे थोडा पारा जास्तच वाढलाय. कारण धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही एकाच मंचावर आलेले आहेत.मला माध्यमांनी विचारलं की ‘ताई या कार्यक्रमात तुम्ही आलात हे प्रमुख आकर्षण आहे का?’ मी म्हटलं इथं जे बसले आहेत, त्यांच्याकडे बघता माझ्याकडे संवैधानिक अशी कोणतीही भूमिका नाही. पण जिल्ह्याची पाच वर्षं पालकमंत्री म्हणून काम करत असताना जात, पात ,धर्म, द्वेष बाळगला नाही. प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं. त्याचवेळी मनापासून इच्छा होती की आपल्या परळीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना व सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना या योजनेचं आम्ही बीजारोपण केलं. पण काही कारणास्तव ती योजना पुढे जाऊ शकली नाही. मी धनंजयचं अभिनंदन करते की आता ही योजना पुढे जाईल. त्यासाठी २८६ कोटी रुपयांचा निधी आला आहे. मी एवढंच सांगेन की अत्यंत चांगलं काम या माध्यमातून व्हावं. 

.....तर लोकं दारात येऊन आशीर्वाद देतील

मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की, नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भाजपाचं तीन राज्यांमध्ये सरकार आलं आहे. त्या राज्यांमध्ये काही योजना आहेत. मध्य प्रदेशमधील "लाडली बहन" सारखी योजना,   आपल्याकडेही राबवली आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर लोकं दारात येऊन आशीर्वाद देतील. आपल्याला पुन्हा संधी देतील असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

••••

•••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !