ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड तात्काळ द्या:- अनिल बोर्डे

 ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड तात्काळ द्या:- अनिल बोर्डे       


    

 गेवराई:- ज्येष्ठ नागरिकांना  आयुष्यमान कार्ड तात्काळ देण्यात यावे यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ गेवराई व जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय गेवराई यांची प्रत्यक्ष भेट घेतली व निवेदन सादर करण्यात आले. त्याची प्रत तहसीलदार गेवराई यांना देण्यात आली                    

         गेवराई शहरातील व तालुक्यातील बऱ्याच लोकांना आयुष्यमान कार्डचे वाटप अद्याप पर्यंत झालेले नाही ही बाब अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय गेवराई यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.                            

           ज्येष्ठ नागरिकांना आपल्या रुग्णालयामार्फत आयुष्यमान कार्ड तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे रुग्णालयामार्फत जेष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजना सुरू केल्या आहेत त्याचा तात्काळ लाभ मिळावा व आपले रुग्णालय अद्यावत करण्यात यावे व सर्व मशिनरी सुस्थितीत असणे आवश्यक आहे याची काळजी घ्यावी.

        तरी ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड पुरविण्याबाबत आपण जातीने लक्ष पुरवून कारवाई होणे अपेक्षित आहे अशी मागणी जेष्ठ नागरिकाच्या वतीने करण्यात आली. तरी ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक संघ गेवराई किंवा ग्राहक मार्गदर्शन केंद्र गेवराई यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन अनिल बोर्डे यांनी केले आहे.    

     या निवेदनावर जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे मोहन राजहंस विश्वास चपळगावकर प्रकाश भुते रामेश्वर थळकर प्रकाश दावणगिरे आधीच्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार