परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुचना

 संभाव्य कोरोना साथीमध्ये जनतेने काळजी घ्यावी 


बीड,दि.28 (जिमाका) : जगामध्ये JN.1 या कोरोना विषाणु मुळे जगामध्ये फ्रान्स, अमेरिका, सिंगापुर, कॅनडा, युनायटेड किंगडम, स्विडन, या देशांमध्ये या विषाणुची लागण मोठया प्रमाणात होत असल्याची दिसुन येत आहे. तसेच भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसुन येत आहे.


तरी बीड जिल्हयामध्ये कोरोना तसेच कोरोनाचा JN.1 प्रकारच्या विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणुन जनतेने खालील प्रमाणे काळजी घ्यावी. जेणे करून बीड जिल्ह्यात या आजाराचा प्रसार आपणास रोखता येईल.


            गर्दीच्या ठिकाणी जात असताना सर्वांनी मास्कचा वापर करावा. प्रवाशांनी प्रवासामध्ये मास्कचा वापर करावा. घरी आल्यानंतर सर्वांनी सावणाने स्वच्छ हात धुवावेत. सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर हात कोणत्याही पृष्ठभागास लावु नयेत. त्याचबरोबर शक्यतोवर हस्तांदोलन करणे टाळावे.  शक्यतो, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे परंतु जाणे आवश्यक असल्यांस सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून जावे आणि खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल किंवा मास्क असणे आवश्यक आहे.


सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर उघडयावर धुंकु नये. हातांच्या स्वच्छतेकरिता वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावेत व सॅनिटायझरचा वापर करावा. सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवुन उपचार सुरु करावेत.  सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास उपचार घेणे टाळण्यात येवु नये. लग्न समारंभ इत्यादी ठिकाणी लोकांनी मास्क घालुन जावे, त्याठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे. तसेच सॅनिटायझर चा वापर त्याठिकाणी असावा. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचा आजार, श्वसनसंस्थेचे आजार असलेले रुग्ण यांनी वैद्यकीय सल्ला घेवुन आपले आरोग्य चांगले राहील याची काळजी घ्यावी, त्याचबरोबर वृध्द व्यक्ती, गरोदर माता, एक वर्षाच्या आतील बालके इत्यादींनी सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.


अशा सुचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. त्याचे पालन नागरीकांनी केल्यास कोरोनाचा प्रार्दुभाव थांबिण्यात येईल.


● युट्यूबवर आवश्य पहा :













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!