परळीकरांचे प्रेम,पाठिंबा व विश्वास पाठिशी

परळीत सोशल मीडियावर'आय सपोर्ट चंदूशेठ' चा ट्रेंड : परळीकरांच्या विश्वासाच्या भावना


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       परळीच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक चळवळीत सातत्याने अग्रेसर असलेले कुटुंब म्हणजे बियाणे कुटुंब आहे. या बियाणी कुटुंबावर परळी व परिसरातील नागरिकांचा मनापासून विश्वास व प्रेम आहे. याची प्रचिती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिसून येत आहे. परळीत सोशल मीडियावर 'आय सपोर्ट चंदूशेठ' चा ट्रेंड आल्याचे दिसत आहे.

           सध्या सर्वच मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत असल्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यामध्ये काही पतसंस्थांच्या बाबतीमध्ये जी संभ्रमावस्था निर्माण झाली त्यामध्ये वास्तविकता नसतानाही चंदुलाल बियाणी अध्यक्ष असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट बाबतीतही काही दिवस उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र कोणत्याही ठेवीदार, सभासद व ग्राहकाला एक रुपयाचाही फटका बसणार नाही याची प्रत्येकालाच अंतर्मनातून खात्री आहे. चर्चा, अफवा व काही हितशत्रूंनी वातावरण दूषित करून पतसंस्थेबाबतीतले नागरिकांचे मत नकारात्मक बनविण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्वसामान्य नागरिक व ठेवीदारांचा या पतसंस्थेवर आणि अध्यक्ष चंदुलाल  बियाणी यांच्यावर विश्वास असल्याची भावना अनेकजण व्यक्त करीत आहेत. याचे प्रतिबिंब आता सोशल मीडियावरही बघायला मिळत आहे. 'अडचणीच्या परिस्थितीत चंदूशेठ आम्ही तुमच्यासोबत आहोत' अशा पद्धतीने आय सपोर्ट चंदूशेठ हा ट्रेण्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर आल्याचे दिसून येत आहे. 'आय सपोर्ट चंदूशेठ' या ट्रेण्डखाली अनेक जण आपला चंदुलाल बियाणी यांच्यावर विश्वास असल्याची भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.

       दरम्यान राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्था काही अडचणीतून जात असताना गेल्या अनेक वर्षापासून  ग्राहकांचा असलेला विश्वास तसुभरही ढळू न देण्याचा प्रयत्न अध्यक्ष चंदुलाल बियाणे व सर्व संचालक मंडळ करत आहे. सर्वांनाच एकाच वेळी पैसे उपलब्ध करून देणे कोणत्याही संस्थेला शक्यच नाही.अनेक  त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत करून प्रत्येक ठेवीदार, ग्राहक, सभासद यांचा पै न पै सुरक्षित असून कोणीही भुलथापांना, अफवांना व नाहक चर्चांना बळी न पडता या कठीण परिस्थितीत ही आपली संस्था असून ती टिकावी व यापूर्वी जी विश्वासाची वाटचाल सुरू आहे ती अविरत सुरू राहावी असाच प्रयत्न पतसंस्थेचा आहे  लवकरच सर्वकाही सुरळीत होणार असल्याचा विश्वास अनेकांना आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार