विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशी व लक्ष्मण गुट्टे यांचा हृदय सत्कार

 स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवून प्रशासनात परळीचा टक्का वाढला पाहिजे- सौ.उषा किरणकुमार गित्ते


 विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशी व लक्ष्मण गुट्टे यांचा हृदय सत्कार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

 एमपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावलेल्या परळीच्या नरेंद्र मनोहर जोशी व विक्रीकर निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नंदनज येथील लक्ष्मण गुट्टे या यशस्वीतांचा  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्षा सौ. उषा किरणकुमार गित्ते यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात परळीचा टक्का वाढला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

          विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित किरण गित्ते आयएएस अ‍ॅकडमीच्या वतीने एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र मनोहर जोशी व लक्ष्मण दिनकरराव  गुट्टे नंदनज यांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरणकुमार  गित्ते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सह सचिव प्रदीप खाडे सर, उद्योजक सुरेश नाना फड, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, मनोहर जोशी, लक्ष्मण गुट्टे, पत्रकार प्रा. रवींद्र जोशी,संपादक बालासाहेब फड,महादेव गित्ते आदी उपस्थितीत होते.

       यावेळी बोलताना प्रदीप खाडे यांनी सांगितले की, किरणकुमार गित्ते यांच्या माध्यमातून परळीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय सुसज्ज अशा प्रकारचे व्यवस्था निर्माण करण्यात आली असून परळी व परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. ही मोठी उपलब्धी असून किरणकुमार गित्ते व सौ. उषाताई गीते यांच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रशासनात आपल्या परळीचे विद्यार्थी स्थान मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी  सांगितले की, परळी व परिसरात अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे काम किरण गित्ते आयएएस अकॅडमीच्या वतीने सुरू असून या माध्यमातूनच येणाऱ्या काळात नक्कीच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात परळीचे विद्यार्थी स्थान मिळवतील. त्यासाठी नरेंद्र जोशी,लक्ष्मण गुट्टे यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे त्यांनी सांगितले.

         यावेळी सौ. उषाताई किरणकुमार गित्ते यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनत आत्मविश्वास व सातत्य अत्यंत आवश्यक असून यामुळेच आज नरेंद्र जोशी असो की लक्ष्मण गुट्टे या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. येणाऱ्या काळात प्रशासनातील परळीचा टक्का वाढावा यासाठी किरणकुमार गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी परळीतच सर्व सेवा सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी राज्यातून प्रथम आलेल्या नरेंद्र जोशी व लक्ष्मण गुट्टे या यशस्वीतांनी उपस्थितांशी संवाद साधत एमपीएससी परीक्षेच्या तयारी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले. कार्यक्रमास किरणकुमार गित्ते आयएस अकॅडमीचे विद्यार्थी कर्मचारी शिक्षक  आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !