प्रेमरुपी कौतुकाचा वर्षांव अन् भारावलेला सोहळा !*

 सकल ब्राह्मण समाजाकडून झालेल्या कौतुकाने मिळाली प्रचंड उर्जा - एमपीएससी स्टेटटाॅपर नरेंद्र जोशी


एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या  नरेंद्र जोशीचा शानदार कौतुक सोहळा

प्रेमरुपी कौतुकाचा  वर्षांव अन् भारावलेला सोहळा !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र मनोहरदेव जोशीचा सकल ब्राह्मण समाजाकडून शानदार व आत्मिय भारावलेल्या वातावरणातील सोहळ्यात ह्रदय सत्कार करण्यात आला. परळीत लहानाचा मोठा झालेला व संघर्षातून यशोशिखर सर केलेल्या परळीच्या या भूमिपुत्राने परळीकरांची प्रशासकीय क्षेत्रात मान उंचावली आहे.तो परळीकरांचा अभिमान बनला असल्याच्या भावना या सोहळ्यात व्यक्त करण्यात आल्या.सकल ब्राह्मण समाजाकडून झालेल्या कौतुकाने आपल्याला  प्रचंड उर्जा मिळाली असल्याचे नरेंद्र जोशी यांनी यावेळी सांगितले.

            ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विश्वस्थ वे.शा.सं. मनोहर जोशी यांचे चिरंजीव नरेंद्र मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी) वतीने घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षकांच्या (एसटीआय) परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.यादैदिप्यमान यशाबद्दल  सकल ब्राह्मण समाजाकडून आज  (रविवार दि. २४ डिसेंबर) स्व.मनोहरपंत बडवे सभागृह विठ्ठल रुक्मिणी मंदिर,देशपांडे गल्ली परळी वैजनाथ येथे चि.नरेंद्र मनोहर जोशी यांचा 'कौतुक सोहळा' आयोजित करण्यात आला होता. 

      या कार्यक्रमात सकल ब्रह्मवृंदांच्या वतीने शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन नरेंद्र जोशी ,त्याचे आई वडील, आजी यांचा सहकुटुंब ह्रदय सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी दीप प्रज्वलन व ब्रह्मवृंदांचे शांतीपठण झाले.तसेच सुवासींनीनी औक्षण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. यावेळी बोलतांना मनोहरदेव जोशी यांच्या संघर्षातून व संस्कारातून नरेंद्रने मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरक असल्याचे सांगुन भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतही नरेंद्रने यश संपादन करावे असे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. 

          यावेळी जेष्ठनेते श्रीकांत मांडे,ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे सचिव प्रकाश जोशी,कोषाध्यक्ष वासुदेव पाठक, भवानराव देशमुख, प्रा.रविंद्र जोशी, अंबाजोगाईचे रविंद्र पांडे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र नव्हाडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत कानेगावकर यांनी केले.

         या कौतुक सोहळ्यास परळीतील सकल ब्राह्मण समाज बांधव, भगिनी, आप्तेष्ट,स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !