राज्यभरातून २ हजार प्राध्यापक होणार सहभागी

 राज्यस्तरीय इतिहास परिषदेचे ३०, ३१ रोजी आयोजन



 राज्यभरातून २ हजार प्राध्यापक होणार सहभागी


सोलापूर : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद, पुणे विभाग व सोलापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास प्राध्यापक परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दिनांक ३० आणि रविवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी वीरतपस्वी प्रशालेच्या मैदानावर होणार असल्याची माहिती संयोजक प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी, प्रा. संजय जाधव, प्रा. सुनील शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 


प्रचलित व्यवस्थेत इतिहासातील घटना, विद्यार्थ्यांची जडणघडण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या आदी बहुमोल विषयांवर चर्चा करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असले तरी यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्याचा इतिहास राज्यस्तरावर नेण्यासाठी ही उत्तम संधी आहे असे प्रा. कलशेट्टी म्हणाले.


आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, नाशिकचे आमदार सत्यजित तांबे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोमपा आयुक्त शितल उगले-तेली तसेच युवा उद्योजक महेश बिराजदार, काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 


दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनामध्ये पाच सत्रांमध्ये मान्यवरांची व्याख्याने होतील. तर समारोपाप्रसंगी श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (अक्कलकोट संस्थान), शिवाजीराजे जाधव (राजमाता जिजाऊंचे १७ वे वंशज), जयंत आसगावकर (शि. आमदार), दत्तात्रय सावंत (शि. आमदार) आदी प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी संपादित विशेष स्मरणिका प्रत्येक सहभागी प्राध्यापकांना देण्यात येणार आहे. सोलापूरच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारी माहिती यामध्ये दिली आहे. शिक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे आणि अधिक माहितीसाठी ९३७०४१३०५१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


● युट्यूबवर आवश्य पहा :












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार