इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

सिरसाळा येथील श्रीपंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 सिरसाळा येथील श्रीपंडितगुरू  पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 




सिरसाळा (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालय  नाट्यशास्त्र विभाग, सिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबीर दि. २९/१२/२०२३ शुक्रवार रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये नुकतेच संपन्न झाले.    

     सदरील कार्यक्रमाचे उध्दघाटन बीड येथील के. एस. के. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागातील प्रा . डॉ. दुष्यंता रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. व्यंकटराव कदम हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर शिवछत्रपती महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. एन. वळेकर, बलभीम महाविद्यालय, बीड येथील नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. केशव भागवत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील, विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर कणसे हे उपस्थीत होते.

    ग्रामीण भागातील कलावंतांना अशा प्रकारच्या नाट्य प्रशिक्षण शिबिरामुळे नृत्य, नाट्य आणि संगीत तसेच रंगभूषा वेशभूषा, दिग्दर्शन, अभिनय, व्यक्तिमत्व विकास याचे योग्य व शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण मिळून देण्यासाठी नाट्यशास्त्र विभागाचा हा अविरतपणे उपक्रम चालू असून हे या उपक्रमाचे ११ वे वर्ष आहे. तसेच विवीध राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देऊन आपल्या प्रास्ताविकात  नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर कणसे यांनी आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमाच्या उद्धघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा डॉ. दुष्यंता रामटेके यांनी ग्रामीण भागात असे सतत उपक्रम घेणे आणि ते यशस्वी करणे खूप मोठे काम असून महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग हा अत्यंत चांगल्या व यशस्वीपणे  घेणारा मराठवाड्यातील पहिला विभाग असल्याचे सांगितले. उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के . के. पाटील यांनी केला, त्यात त्यांनी नाट्यशास्त्र विभाग हा सतत नवनवीन उपक्रम घेत असतो, याचा मला अभिमान आणि आनंद आहे.

     शिबिरातील दुसरे सत्र - रंगभूषा व वेशभूषा तंत्र विषयावर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपात  डॉ. दुष्यंता रामटेके यांनी घेतले तर तिसरे सत्र प्रा. केशव भागवत यांनी नाटक आणि व्यक्तिमत्व विकास याविषयावर सविस्तर घेतले. चौथे सत्र - प्रख्यात सिने-नाटय दिग्दर्शक प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय आणि दिग्दर्शन कला यावर सैद्धांतिक व प्रात्यक्षिकासह सविस्तर स्वरूपात घेतले. तर या सत्राच्या शेवटी जेष्ठ रंगकर्मी व प्रख्यात नाट्य लेखक रानबा गायकवाड यांनी नाट्य लेखन आणि संवाद लेखन तंत्र याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.या ज्येष्ठ रंगकर्मी 

विठ्ठलराव झिलमेवाड,प्रसंगी युवा अभिनेता महेश होनमाने,कलावंत आसेफ शेख आदींची उपस्थिती होती.

   या नाट्य प्रशिक्षण शिबिरात एकूण ७० विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. या नंतर सदरील प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी कलावंतांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

    सदरील उपक्रमामध्ये सूत्रसंचालन प्रा.डॉ. एस. बी. फुलारी यांनी  तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.टी. एच. देवकर यांनी केले. सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा . डॉ. एच. पी. कदम, प्रा. डॉ. बी.ए. साबळे, डॉ. जी. एन. सोनवणे, डॉ. ए. व्ही. कासांडे, प्रा. डी. व्हि. झिंझुर्डे, श्री. उदयकुमार गवळी, श्री . टेकाळे नाना महाविद्यालयातील  सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!