लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन ; पंकजा मुंडेंनी केले सर्वांचे स्वागत

 मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गोपीनाथ गडावर नतमस्तक

लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन ; पंकजा मुंडेंनी केले  सर्वांचे स्वागत


परळी वैजनाथ ।दिनांक ०५।

महाराष्ट्र शासनाच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानिमित्त परळीत आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळी आज नतमस्तक होऊन दर्शन घेतले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि गोपीनाथ गडाची प्रतिमा देऊन स्वागत केले.


राज्य शासनाच्या वतीने परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री परळीत आले होते. दुपारी सव्वा दोन वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर आगमन झाले. जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी लोकनेते मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तदनंतर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी बीड जिल्ह्यातील आणि परळी तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.

••••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !