भगवान दत्तात्रेय हेच फक्त अखिल विश्वाचे एकमेव विश्वगुरू-ॲड.दत्ता महाराज आंधळे

 भगवान दत्तात्रेय हेच फक्त अखिल विश्वाचे एकमेव विश्वगुरू-ॲड.दत्ता महाराज आंधळे



अक्कलकोट (प्रतिनिधी) अनसूया नंदन भगवान दत्तात्रय हेच अखिल विश्वाचे एकमेव विश्वगुरू आहेत. ज्ञाननिधी, योगी जनप्रिय असलेले श्री गुरु दत्तात्रेय आहेत संत वाङ्म़याचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.

       अक्कलकोट तालुक्यातील काझी कणबस या गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन सेवा श्री दत्त जयंतीच्या दिवशी करताना श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा " तीनशिरे सहा हात/ तया माझा दंडवत // "या अभंगावर अतिशय पौराणिक व विविध ग्रंथाचे दाखले देत अनसूया नंदन श्री दत्तात्रेय यांचे जन्माख्यान व चरित्र सांगितले. संपूर्ण चराचर सृष्टीचे  एकमेव विश्वगुरू भगवान दत्तात्रेय आहेत हे निक्षून सांगितले.

श्री रामचंद्र धर्मसाले सर, श्रीपरमेश्वर पांचाळ, श्री काशिनाथ कोळी, श्री दत्तात्रय धर्मसाले ज्ञानेश्वरी पारायण समितीचे अध्यक्ष श्री नारायण बंदीछोडे, भजन प्रमुख किशोर जाधव ,श्रीमंत जाधव,गायनाचार्य विश्वनाथ जाधव, मृदंगाचार्य सागर पांचाळ महाराज,मोहन चव्हाण,नागनाथ हांडगे आदींची उपस्थिती होती.

या कीर्तनास भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !