गीता जयंती उत्साहात साजरी.

 खोलेश्वर शैक्षणिक संकुल भारतीय संस्कृती जपण्याचे व रूजविण्याचे कार्य करते. :- प.पू.भारतानंदजी स्वामी



खोलेश्वर शैक्षणिक संकुल,साहित्य निकेतन ग्रंथालय व गीता धर्म मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गीता जयंती उत्साहात साजरी



अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  येथील खोलेश्वर शैक्षणिक संकुल,साहित्य निकेतन ग्रंथालय व गीता धर्म मंडळ यांच्या संयुक्त वतीने गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खोलेश्वर शैक्षणिक संकुलात सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने झाली. भगवद्गीता,  भगवान श्रीकृष्ण तसेच रामजन्मभूमी न्यासाकडून आलेला अक्षदा कलश यांचेही पूजन करण्यात आले. यावेळी श्री.नृसिंह सरस्वती वेदपाठशाळेचे श्री. नवनाथ जोशी गुरूजी व त्यांच्या शिष्यांनी ईशावास्योपनिषदाचे पठण केले.

प्रमुख अतिथी प.पू.भारतानंदजी स्वामी यांचे स्वागत स्थानिक व्यवस्था मंडळ अध्यक्ष श्री.विजयराव वालवडकर व स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह श्री.किरणदादा कोदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. गीता जयंतीच्या निमित्ताने 700 विद्यार्थ्यांच्या सहभागाने गीतेच्या 700 श्लोकांचे लिखाण करण्यात आले. त्यानंतर बालकिर्तनकार चि. चैतन्य महाराज फुंदे यांनी भगवद्गीतेचे महत्व आपल्या ओघावत्या शैलीत  विषद केले. यावेळी सर्व विद्यार्थी ज्ञानोबा तुकाराम या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात तल्लीन झाले होते.  त्यांना बिभीषण महाराज व अमोल महाराज यांच्या भजनी मंडळाने अतिशय सुरेख साथ दिली. त्यानंतर श्री.विष्णू इरळे यांच्यासोबत सर्व विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे सामूहिक पठण केले. प.पू.भारतानंदजी स्वामी यांनी बोलताना असे सांगितले की,खोलेश्वर शैक्षणिक संकुल हे भारतीय संस्कृतीची जपवणूक व्हावी व संस्कार विद्यार्थ्यांना रुजावेत यासाठी खूप प्रयत्न करते. देव ,देश धर्म व कर्म  हे तत्व प्रत्येकाने जपले पाहिजे. भारतीय संस्कृती जपणारी पिढी निर्माण करण्याचे कार्य  भा.शि.प्र.संस्था व खोलेश्वर शैक्षणिक संकुल हे करत असते. आपले स्वप्न पूर्ण करताना या भारतमातेची सेवा करायला विसरू नका, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यानंतर प.पू.भारतानंदजी स्वामी व रा .स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह श्री.बिपीन दादा क्षीरसागर,स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष श्री.विजयराव वालवडकर,स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह श्री.किरणदादा कोदरकर,शालेय समिती अध्यक्ष डाॅ.अतुल देशपांडे,खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री.अप्पाराव यादव,केंद्रीय कार्यकारिणी सदस्या व प्रगती विभाग प्रमुख सौ.वर्षाताई मुंडे,सौ.भारती मॅडम,प्राचार्यां डाॅ.मुकुंद देवर्षी,सौ. शिंदे ताई यांच्या हस्ते संकुलातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भगवद्गीतेच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी,प्रास्ताविक श्री.किरणदादा कोदरकर यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख सौ.वर्षाताई मुंडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !