बळीराजा सुखी तर राज्यकर्ते सुखी; धनंजय मुंडेंनी सभागृहात वाचले छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र!

 राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविण्याचे नियोजन सुरू - धनंजय मुंडेंची माहिती


शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी राज्यात 'ड्रोन मिशन' राबवणार - मुंडेंची विधान परिषदेत घोषणा


*शेतकऱ्यांना दोन्ही हातांनी देण्याची नियत असलेले हे सरकार आहे - धनंजय मुंडे*


*नमो किसान महासन्मान, पीकविमा, अवकाळीचे अनुदान यांसह विविध योजनांची आकडेवारी धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत मांडली*


बळीराजा सुखी तर राज्यकर्ते सुखी; धनंजय मुंडेंनी सभागृहात वाचले छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र!


नागपूर (दि. 19) - शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांचे सरकार गेले, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि शिवरायांचे शेतकरी धोरण याला अनुसरून प्रामाणिक काम करणारे सरकार आहे. दोन्ही हातांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची नियत असलेले हे सरकार आहे, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत नियम 97 अंतर्गत चर्चेच्या उत्तराच्या निमित्ताने व्यक्त केले.


राज्यात नमो किसान महासन्मान योजनेतून सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हफत्यापोटी 1720 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यामधील निकषांमुळे पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी चार महिने विशेष मोहीम राज्यभर राबवण्यात आली. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया द्यावा लागला तर दुसरीकडे आतापर्यंत सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना अग्रीम 25% प्रमाणे 2216 कोटी रुपये रक्कम मंजूर करून त्यापैकी आतापर्यंत 1700 कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे वितरण पूर्ण करण्यात आले व उर्वरित रक्कम वितरण सुरू आहे. सहा जिल्ह्यातील विमा कंपन्यानी केंद्र सरकार कडे अपील केले असून, ती सुनावणी पूर्ण होताच या सहा जिल्ह्यांचा विमा देखील अग्रीम प्रमाणे दिला जाईल. या वर्षी अग्रीम अंतर्गत देण्यात आलेली मदत ही मागील 5 वर्षातील रक्कमेच्या तुलनेत अनेक पटींनी मोठी आहे, हेदेखील मुंडेंनी आकडेवारी सह सभागृहासमोर मांडले. 


त्याचबरोबर अवकाळी व गारपीटीचे अनुदान नवीन घोषणेप्रमाणे वाढीव दराने मंजूर करण्यात येत असून यांतर्गत बाधित शेतकऱ्यांना सुमारे 1458 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे, त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण देखील सुरू केले आहे, असेही मुंडे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, फळपिकविमा, यांसह शासनाने लाभ दिलेल्या अन्य योजनांची देखील आकडेवारी विधानपरिषदेत दिली. 


*राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायातीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळेल, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल असेही धनंजय मुंडे म्हणाले.*


*शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत यादृष्टीने राज्यात 'ड्रोन मिशन' राबविण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे, याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.*


धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार रुपयांची मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत करण्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी यावेळी केली, तसेच यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणत 'शेतकरी सुखी तर रयत सुखी आणि रयत सुखी तर राज्यकर्ते सुखी!' शेतकऱ्याला त्रास होऊ नये असे त्यांचे धोरण होते, त्याला अनुसरूनच आमचे हे सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे, असे धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञापत्रच सभागृहात वाचून दाखवले. 


या उत्तरानंतर धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सविस्तर व मुद्देसूद उत्तराबद्दल विधानपरिषद सदस्य  आ.प्रवीण दरेकर  आ.प्रसाद लाड यांनी धनंजय मुंडे यांचे अभिनंदन व कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !