घाटनांदुर येथे होत असलेल्या मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ अधिवेशन: प्रासंगिक लेख

 आणि ग्रंथोपजिविये : ग्रंथमित्र नरहरी (दादा)शहाणे मंठेकर

--------------------------------

ग्रंथमित्र नरहरी (दादा)शहाणे मंठेकर हे गुरुदास सेवा आश्रमाचे संचालक, ग्रंथ मित्र चळवळीचे प्रमुख व  सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. ग्रंथालय चळवळीत अग्रगण्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक आहे.  ग्रंथालय धोरणाचे तज्ञ, अभ्यासक व सेवाभावी वृत्तीने जगणारे व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. वृद्धाश्रमातील लोकाच्या निराधारपणावर मात करण्यासाठी प्रयत्नशील असणारे,सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.  वंदनीय राष्ट्यसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरीत होऊन,ते कालकथीत गुरू महाराज, दास लालाजी महाराज दहीवाळ ,आणि सहकारी यांच्या समवेत घाटनांदूर ता.अंबाजोगाई जिल्हा बीड येथे सेवारत आहेत. ग्रंथालय संघटना व समूहांना विचारनिष्ठ  राहण्यासाठी सदैव मार्गदर्शन करत असतात.  ग्रंथालय चळवळी सोबतच पदलित,गोरगरीब विद्यार्थ्यांच्या,स्त्रियांच्या ,अबाल वृद्धांच्या  परिवर्तनासाठी विचार प्रबोधनासाठी अनेक उपक्रमाचे आयोजनही   त्यांनी केले आहे. वयाच्या पंचाहत्तरीत कार्यरत राहून,समाजसेवक म्हणून त्यांनी एक आदर्श निर्माण केला असून लोकप्रिय पव्यक्ती व एक उत्तम प्रशासक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.  समाजातील दुर्लक्षीत घटकांत उत्साह उत्पन्न करणे,  त्यांच्यात स्फूर्ती व प्रोत्साहन निर्माण करून त्यांना जीवनाची दिशा दाखवणे हे सर्वस्वी उत्तम कार्यकर्त्यांवर अवलंबून असते.  ते नुसतेच विद्वान असून चालत नाहीत  ते सर्वश्रुत  समाजाभिमुख असायला हवेत.  त्यांची वाणी व वागणे शुद्ध असायला हवे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नरहरी शहाणे मंठेकर होय! 

ग्रंथालय क्षेत्रात ते निपुण आहेत.  ते सतत ऊर्जा मिळेल असेच कार्य करतात. जगण्याची जिद्द कशी तेवत राहील. निरामय जीवन कसे जगावे,   वाचन सवय कशी लावून घ्यावी यासाठी ग्रंथप्रेमीच वाचन संस्कृती घडवू शकतो. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी नरहरी मंठेकर निष्ठेने  कार्यरत आहेत.

वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदास सेवा आश्रम घाटनांदूर तर्फे  मुलांचे वसतिगृह, निराधार

महिलाचे शिक्षण-प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी बालक मंदिर महिला बचतगट, संगीत विद्यालय आदींच्या माध्यमातून समाजसेवक म्हणून कार्य करीत आहेत.

ग्रंथालय चळवळीत सक्रिय सहभागाबद्दल अनेक

सन्मान प्राप्त झाले आहेत.

सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे घाटनांदूर येथे

सन १९८५ ला गुरुदास सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना केली.

'गांव तिथे ग्रंथालय' हा उद्देश समोर ठेवून विविध

ठिकाणी ५०० च्या आसपास सार्वजनिक ग्रंथालयांना

मार्गदर्शन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयाच्या संदर्भात आयोजित अधिवेशने, कार्यशाळा, चर्चासत्र, शिबीर, संमेलन इत्यादी कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील

अनेक संघटनांशी व कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध महाराष्ट्र आहेत.

राज्य मराठवाडा विभाग व बीड जिल्हा ग्रंथालय संघ या वेगवेगळ्या संघाच्या विविध पदावर राहून ग्रंथालय चळवळीचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते तत्पर असतात.दारूबंदी साठी  (शिक्षण) संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत कार्यक्रम आयोजित करून प्रबोधन केले.

जिल्हा दारूबंदी प्रचार कार्यालय बीडमार्फत व्यसनमुक्ती प्रचारकार्य सुरू आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन 'सार्वजनिक ग्रंथालय भूषण' सन्मान ,बीड जिल्हा ग्रंथालय संघ'घाटनांदूर भूषण सन्मान', गजानन पतसंस्था घाटनांदूर इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच बरोबर

डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता

ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य नगर भवन, मुंबई ,कै.लिलादेवी सिताराम अग्रवाल सा. वा. सिल्लोड जि. औरंगाबाद राज्यस्तरीय आदर्श उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार,

 मराठवाडा लोकविकास प्रतिष्ठाण, बीड.

आदर्श सार्वजनिक ग्रंथालय संघ उत्कृष्ट कार्यवाह पुरस्कार, कै. रघुनाथ मुंडे सा. वा. वरवटी ता. अंबाजोगाई जि. बीड.,बीड जिल्हा ग्रंथालय भूषण पुरस्कार,

कै. अनुसया तालुका सार्वजनिक वाचनालय, वझुर ता. पुर्णा जि. परभणी जीवन गौरव पुरस्कार व सन्मापत्र आदी सन्मान त्यांचे नावे आहेत.

ग्रंथमित्र श्री. नरहरी मंठेकर हे ग्रंथालय चळवळीमध्ये गेल्या ३५ वर्षापासून सक्रिय कार्यरत आहेत. त्यांनी बीड जिल्हा ग्रंथालय संघावर

१५ वर्षे कार्यवाह, मराठवाडा विभाग संघावर उपकार्याध्यक्ष, महाराष्ट्र

राज्य ग्रंथालय संघाचे संचालक, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या

ग्रंथ परिवार मासिक चे सल्लागार सदस्य ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा

केंद्र अंबाजोगाई जि. बीड वर्गप्रमुख इत्यादी पदावर राहून कार्य केले.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार सरणीला अनुसरून बीड

जिल्हयातील व्यसनाधिन लोकांचे पुर्नवसन केले. व्यसनमुक्ती आर्थिक,

बौध्दिक विकास करण्यासाठी महिला बचतगट चळवळीत सक्रीय

भाग घेऊन कार्य केले आहे. बीड जिल्ह्यातील निराधार वृध्द मुले, मुली, महिला

यांचे सेवा माध्यमातून जीवनमान सुधारकरण्याकरिता कार्य व मार्गदर्शन सुरु आहे.


     ग्रामीण भागातील वाचन चळवळ गतिमान  व्हायला हवी म्हणून सतत नवनवीन प्रयोग ते करीत असतात.

सकस समाज व माणसे ही  ग्रंथ, ग्रंथालय या माध्यमातून यातून तयार होत असतात अशी त्यांची धारणा आहे.  यासाठी सुसज्ज ग्रंथालय  उपलब्ध असणेही अनिवार्य आहे. गाव तिथे ग्रंथालय मोहीम हाती घेऊन ते प्रयत्नशील आहेत.

वाचनाची आवड असल्याने ते सतत   वाचन करतात. प्रसंगी लेखनही करतात.

साहित्य, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. मंठेकर दादांना अनेक मान सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  मंठेकर नेटाने व सचोटीने निभावत आहेत.त्यांच्या निस्वार्थी वृत्तीस वंदन!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

"आणि ग्रंथोपजिविये | विशेष लोकी इये | दृष्टादृष्ट विजये होवावेजी ||||

चांगल्या गोष्टीत यश मिळतेच. ग्रंथांचे वाचन करून मनावर चांगले संस्कार करून या पृथ्वीतलावर विजय दृष्टिक्षेपात सहज येतो. या तत्वाचा अंगीकार करून गुरुदास सेवा आश्रमातील साधक नरहरी मंठेकर कार्यरत आहेत.


अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वाचकप्रिय सायं.दै. परळी बुलेटीन अंकाचा दिवाळी विशेष अंकाचे विमोचन  घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमात मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.  सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ बडे तर उद्घाटक म्हणून वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दळवे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे,  गुरुदास सेवा आश्रम घाटनांदूर येथील दास लालाजी महाराज, नरहरी मंठेकर , विठ्ठलराव झिलमेवाड, बालासाहेब इंगळे, संतोष कोदरकर, प्रा. बी. एम. खरात, दत्ताभाऊ वालेकर, सीताबाई दहीवाळ,शामाताई,यमुनाबाई सोनवणे,पत्रकार गोविंद केंद्रे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.या विमोचन सोहळ्या दरम्यान ग्रंथमित्र नरहरी दादा मंठेकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या कार्याचा परिचय झाला.ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ बडे,कथाकार दत्ताभाऊ वालेकर यांच्यामुळे मंठेकर दादांशी आमची मैत्री झाली.घाटनांदूर सोमेश्वर माध्यमिक व उच्च मा. विद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आमचे मार्गदर्शक प्राचार्य दि. ना. फड,एबीपी माझा बीड जिल्हा प्रतिनिधी गोविंद शेळके आणि युवा प्रबोधनकार अविनाश भारती या सन्मित्रांनीही नरहरी मंठेकर यांच्या कार्याचा गौरव केला आहे. दि.४डिसेंबर २०२३ रोजी घाटनांदूर येथे मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे प्रमुख आयोजक म्हणून ग्रंथमित्र नरहरी मंठेकर अग्रणी आहेत.

वंदनीय राष्ट्यसंत तुकडोजी महाराज यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव असणारे, दुर्दम्य इच्छाशक्ती, समाजाप्रती विलक्षण कर्तव्य तळमळ,  आणि ग्रंथ वाचन संस्कृतीचा ध्यास असणाऱ्या  ग्रंथमित्र नरहरी मंठेकर शहाणे  (दादा) यांना  त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अक्षर शुभेच्छा!


✍🏻प्रा. डॉ .सिद्धार्थ तायडे

(९८२२८३६६७५)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !