यश:विजयी अभिनंदन

 मध्यप्रदेशच्या विजयाबद्दल  पंकजा मुंडे यांनी केले मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह संपूर्ण टीमचे अभिनंदन




मुंबई ।दिनांक ०३।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांनी मध्यप्रदेशच्या घवघवीत यशाबद्दल मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेल्या आदेशावर अथकपणे काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन ! असं ट्विट पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. 


   पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे,  ही माझी तीव्र भावना आहे. मध्य प्रदेशातील अनेक प्रगतीशील योजनांपैकी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान   यांचे दोन निर्णय 1. ओबीसीचे आरक्षणात अडथळा न येऊ देता वाचवणे आणि 2. महिलांना सक्षम करण्यासाठी 'लाडली बहन', यामुळे लाखो महिलांनी आम्हांला खऱ्या अर्थाने पक्ष म्हणून आशीर्वाद दिला. मध्य प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा आणि संपूर्ण टीम ज्यांनी कठोर परिश्रम घेतले. माझ्याकडून त्यांचे मनापासून अभिनंदन. महिला मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेल्या आदेशावर अथकपणे काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन ! असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे 

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !