अंबाजोगाईच्या आर्यन वाकडे ची महाराष्ट्र संघात निवड

 अंबाजोगाईच्या आर्यन  वाकडे ची महाराष्ट्र संघात निवड



अंबाजोगाई (प्रतिनिधी)

अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी च्या आर्यन वाकडे ची महाराष्ट्र संघात निवड झाली असून तो आता राष्ट्रीय पातळीवर खेळणार आहे.

शिरपूर या ठिकाणी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 26 ते 29 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून खेळाडूं आले होते. या खेळाडूं मधून महाराष्ट्र चा क्रिकेट संघ निवडण्यात आला पुढील राष्ट्रीय स्पर्धा पटना या ठिकाणी होणार आहेत शालेय नॅशनल स्पर्धा 13 जानेवारी 2024 पासुन होत आहेत.या स्पर्धेत आर्यन संजय वाकडे यांची स्कूल नॅशनल गेम्स साठी निवड झाली.तर वेंकटेश राजेन्द्र जगताप यांची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. 

आर्यन हा उजव्या हाताने गोलंदाजी करतो तर उजव्या हाताने फलंदाजी करतो आर्यन  आणि वेंकटेश ला प्रशिक्षक मोहित परमार, स्वप्नील कोकाटे,माही परमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आर्यन व वेंकटेश अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी मध्ये नियमित सराव करत असतात.आर्यन, व वेंकटश हे श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे   विध्यार्थी आहेत ,आर्यन ला  व वेंकटश ला क्रिडा शिक्षक सतीश बलुतकर,व ज्ञानेश मातेकर सर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्रजी आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य,सह सर्व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य,स्थानिक समन्वय साधून समिती चे अध्यक्ष विजयराव वालवडकर, कार्यवाह किरण कोदरकर, बिपिन दादा क्षिरसागर, शालेय समिती अध्यक्ष डॉ अतुल देशपांडे,यांनी अभिनंदन केले तर आनंद कर्णावट, दत्ता देवकते, संतोष कदम अविनाश साठे, डॉ जनुल्ला,विनोद गंगणे यानी पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार