परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त होणाऱ्या भव्य मोफत कृत्रिम हात , मॉड्युलर पाय व कुबड्या मोजमाप शिबिराचा लाभ घ्यावा-डॉ. संतोष मुंडे

 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त होणाऱ्या भव्य मोफत कृत्रिम हात , मॉड्युलर पाय व कुबड्या मोजमाप शिबिराचा लाभ घ्यावा-डॉ. संतोष मुंडे



                               

  परळी:दिनांक 7 डिसेंबर

           जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे भव्य मोफत कृत्रिम हात,  मॉड्युलर पाय व कुबड्या मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती या शिबिराचे  संपर्कप्रमुख  दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष मा. डॉ संतोषजी मुंडे यांनी दिली.

                   दिव्यांगाचे कैवारी म्हणून ओळख असणारे तसेच विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवणारे त्याचबरोबर प्रसंगी दिव्यांगाच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या अथक प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 या शिबिरांतर्गत ज्या दिव्यांगांना हात किंवा पाय नाही त्याचबरोबर जो दिव्यांग अपघातामध्ये आपला हात किंवा पाय हरवून बसला आहे अशा सर्व दिव्यांग नागरिकांसाठी कृत्रिम हात व मॉड्युलर पाय तसेच कुबड्या ,कॅलिपर्स मोफत देण्यासाठी या मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.


दरम्यान ज्या दिव्यांग नागरिकांचे या शिबिरात मोजमाप होईल त्यांनाच या मोफत हात, मॉड्युलर पाय कुबड्या कॅलिपर्स यांचा लाभ होईल अशीही माहिती देण्यात आलेली आहे.


तरी परिसरातील गरजू दिव्यांगांनी या भव्य मोफत मोजमाप शिबिरासाठी श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान या शिबिराचे संपर्कप्रमुख डॉक्टर संतोष मुंडे यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!