विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 29 डिसेंबर रोजी श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन



परळी प्रतिनिधी.    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर व श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 डिसेंबर रोजी एक दिवशीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा परळी तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी लाभ घेण्याचे आवाहन विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर कणसे यांनी केले आहे.

    29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन डॉ. दुष्यंता रामटेके बीड यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी रा शि.प्र. मंडळ सोनपेठचे अध्यक्ष माजी आमदार वेंकटराव कदम हे आहेत. तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉक्टर के. के. पाटील यांची राहणार आहे. सकाळी 11 ते 12 या दुसऱ्या सत्रामध्ये रंगभूषा आणि वेशभूषा तंत्र या विषयावर प्रशिक्षक म्हणून डॉ. दुष्यंता रामटेके या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. एच. पी. कदम अध्यक्षस्थानी असतील. 

    दुपारी 12 ते 1  या दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या सत्रामध्ये प्रशिक्षक म्हणून प्रा. केशव भागवत हे उपस्थित राहणार असून ते नाटक आणि व्यक्तिमत्व विकास यावर आपले मार्गदर्शन करतील. तर अध्यक्षस्थान डॉ. एच. डी. परळकर करतील. चौथे सत्र दुपारी 1:30 ते 3:30 च्या दरम्यान संपन्न होणार आहे. या सत्रामध्ये प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे हे दिग्दर्शन आणि अभिनय हा विषय विद्यार्थ्यांना सहज पद्धतीने विशद करतील. तर प्रा डॉ व्ही.एस.धन्वे अध्यक्षस्थानी असतील. याच सत्रात  नाट्य लेखक व पटकथाकार रानबा गायकवाड नाट्य लेखन आणि संवाद लेखन तंत्र हे सांगतील तर अध्यक्षस्थानी प्रा. बी ए साबळे भूषवतील.

   रा शि प्र. मंडळ सोनपेठ चे सचिव प्रा. योगेशजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली समारोप आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे व रानबा गायकवाड उपस्थित असतील. या प्रशिक्षण शिबिराचा परळी तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य के. के. पाटील, विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रशेखर कणसे डॉ. संजय फुलारी, डॉ. तुकाराम देवकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार