अकलूजची तेजस्विनी केंद्रे प्रथम, नगरचा आकाश मोहिते द्वितीय, संभाजीनगरचा आदित्य दराडे तृतीय

 "वैद्यनाथ"च्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक संभाजीनगरच्या पहाडे विधी महाविद्यालयाकडे 



अकलूजची तेजस्विनी केंद्रे प्रथम, नगरचा आकाश मोहिते द्वितीय, संभाजीनगरचा आदित्य दराडे तृतीय


     परळी वैजनाथ (दि.१९)-

                 दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७४ व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून  जवाहर शिक्षण संस्थेच्या येथील वैद्यनाथ महाविद्यालयात आज (दि.१९) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा  उत्साहात संपन्न झाली. यात सांघिक पारितोषिक छत्रपती संभाजीनगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या  संघाने जिंकले .तर स्पर्धेचे वैयक्तिक प्रथम पारितोषिक (₹ ७०००/-व स्मृतिचिन्ह) अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.तेजस्विनी नाथराव केंद्रे हिने पटकावले, द्वितीय पारितोषिक (₹ ५०००/- व स्मृतिचिन्ह) अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजचा विद्यार्थी आकाश दत्तात्रय मोहिते याने मिळवले, तर तृतीय पारितोषिक (₹३००० व स्मृतिचिन्ह) छत्रपती संभाजीनगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य ज्ञानेश्वर दराडे याने जिंकले आणि उत्तेजनार्थ पारितोषिक (₹१०००/-)  सिरसाळा येथील पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी दत्तात्रय साबळे हिने  प्राप्त केले.              

        या स्पर्धेत लातूर, अंबाजोगाई, परळी, सिरसाळा व इतर ठिकाणाहून संघ आले होते. या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मुकुंद देवर्षी हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आर.डी. राठोड हे होते . या कार्यक्रमास उपप्राचार्य डी. के. आंधळे, प्रा. एच.डी. मुंडे,  डॉ.बालासाहेब मुंडे , प्रा.डा. एल.एस.मुंडे, प्रा. डॉ. पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.  या सर्वांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले तर दुपारी विजेत्यांना पुरस्कारांचे व पारितोषिकांचे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

                       यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.देवर्षी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वक्तृत्व कला जोपासत प्रभावी वक्ते बनावे,असे आवाहन केले. ते म्हणाले- ज्यांच्याकडे वक्तृत्व कौशल्य आहे,ते आपल्या प्रभावपूर्ण भाषणाने नेतृत्वगुण संपादन करून समाज व देशात परिवर्तन घडू शकतात. प्राचार्य डॉ.राठोड यांनी प्रभावशाली वक्तृत्वाच्या माध्यमाने वक्त्यांनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर डॉ. पी. आर.थारकर यांनी विद्यार्थी जीवनात भाषण कौशल्य विकसित झाल्याने ते विविध क्षेत्रांत समाज समूहाला नवी दिशा देत प्रगतीचे शिखर गाठू शकतात, असा आशावाद व्यक्त केला.  तर डॉ. मेश्राम यांनी वक्तृत्वासोबतच मानवी मूल्यांचे अधिष्ठान जोपासावे,  अशी भावना व्यक्त केली.                            

             स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रो. डॉ. पी. आर. थारकर (अंबाजोगाई) श्री विनोद चव्हाण (लातूर ) श्री चंद्रशेखर फुटके (परळी ) व टी.ए. गित्ते यांनी काम पाहिले.                  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.आर. जे. चाटे यांनी, विषयमांडणी संयोजक प्रा. डॉ  नयनकुमार आचार्य यांनी व पाहुण्यांचा परिचय प्रा. वाय. डी. रेड्डी यांनी करून दिला. सूत्रसंचालन  प्रा.डॉ. अर्चना चव्हाण व प्रा. दिलीप गायकवाड त्यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. आर. जे. चाटे यांनी मानले. स्पर्धेच्या सफलतेसाठी प्रा. उमाकांत कुरे, प्रा. अभय तिवार, प्रा.डा. एस.पी. गुट्टे, प्रा.एस.बी.रणखांबे व इतरांनी  परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !