लाभ घेण्याचे आवाहन

 आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने स्पाइन केअर आणि पोश्चर ट्रेनिंग कोर्सचे आयोजन 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्यावतीने 18 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठी मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, सांधेदुखी, पक्षघात व त्यामुळे आलेले स्नायू दुर्बलता यावर स्पाईन केअर म्हणजेच पाठीचा मणका आणि शरीर यासंदर्भात प्रशिक्षक डॉ. संगीता सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 


दिनांक 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी 6.30ते 8.30 वाजेदरम्यान वैद्यनाथ महाविद्यालयात स्पाइन केअर आणि पोश्र्चर शिबीर होणार आहे. फक्त महिलांसाठी दुसरी बॅच दुपारी 4 ते 6 वाजेदरम्यान होणार आहे.


शिबिराचा लाभ घेण्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा : 9860474821, 9561788501, 9923177587, 8308236796, 9270060669, 8787041322 असे आवाहन एओएल परिवारातर्फे करण्यात आले आहे.


या शिबिरांतर्गत मान पाठ आणि मणके यांच्यासाठी स्वतःच करता येतील असे व्यायाम प्रकार सांगितले जाणार आहेत. शरीराची शास्त्रशुद्ध बैठक, अॅक्युप्रेशर, चालण्याची शास्त्रीय पद्धत, ध्यानधारणा, याद्वारे ताण तणावापासून मुक्ती, मन, शरीर प्रसन्नता तसेच आत्मबल, मनोबल वाढविण्यासाठी पूर्ण चैतन्यशाली आनंदी निरोगी जीवनाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !