परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ज्ञानबोधिनी प्रा. विद्यालय हे माझे आई वडील - नरेंद्र जोशी

 ज्ञानबोधिनी प्रा. विद्यालय हे माझे आई वडील - नरेंद्र जोशी



एम पी एस सी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा कौतुक सोहळा 

             एम पी एस सी परीक्षेत राज्यात प्रथम आलेला नरेंद्र जोशीचा ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालयाकडून शानदार व आत्मिय भारावलेल्या वातावरणातील सोहळ्यात ह्रदय सत्कार करण्यात आला ज्ञानबोधिनी प्रा विद्यालयाच्या परिसरात लहानाचा मोठा झालेला व बालवाडी ते 7 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत घेतलेला,संघर्षातून यशोषिखर सर केलेल्या या भूमिपुत्राने ज्ञानबोधिनी शाळेची व परळीकरांची प्रशासकीय क्षेत्रात मान उंचावली आहे असे गौरवोदगार शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव श्री मुंडे सर यांनी काढले तसेच भविष्यात त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही नरेंद्रने यश संपादन करावे असे सांगितले.

               ज्ञानबोधिनी प्रा विद्यालय हे माझे एक प्रकारे आई वडीलच आहेत कारण माझ्या आई वडिलानंतर माझ्यावर याच शाळेने चांगले संस्कार केले व या यशात शाळेचा मोठा वाटा आहे व या सत्काराने आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळाल्याचे नरेंद्र जोशी यांनी सांगितले 

 नरेंद्र जोशी यांनी एमपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षकांच्या (STI)परीक्षेत प्रथम ये येण्याचा व दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे या दैदिप्यमान यशाबद्दल ज्ञानबोधिनी विद्यालयाकडून आज शुक्रवार दि29/12/2023 रोजी ज्ञानबोधिनी विद्यालय कृष्णानगर येथे कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ज्ञानबोधिनी विद्यालयाच्या वतीने शाल' श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन आईवडिलांसह सत्कार करण्यात आला

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री गोपनपाळे सरांनी मानले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


● युट्यूबवर आवश्य पहा :














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!