परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
संतवीर ह भ प बंडा महाराज कराडकर यांनी घेतलं प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार संतवीर ह भ प बंडातात्या महाराज कराडकर यांनी आज परळी वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
संतवीर बंडा महाराज कराडकर हे एका कार्यक्रमानिमित्ताने परळी भागात आले असताना त्यांनी आवर्जून बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैजनाथ मंदिरात येऊन वैद्यनाथ प्रभूंचे मनोभावे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वीच बंडा महाराज कराडकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले . या आजारातून बरे झाल्यानंतर प्रथमच ते परळी वैजनाथ येथे आले होते. परळी वैजनाथ येथे त्यांनी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा