इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

 दुखःद वार्ता : सेवानिवृत न.प.कर्मचारी रामचंद्र धर्माधिकारी यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

        येथील जुन्या गावभागातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व व नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी यांचे आज दि. 29 रोजी वृद्धपकाळाने निधन झाले .मृत्यू समयी ते 86 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.


    रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी हे सरकारवाडा अंबेवेस भागातील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते.नगर परिषद परळी वैजनाथ चे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. दीनदयाळ बँकेचे शाखाव्यवस्थापक मुरलीधर धर्माधिकारी, बँक कर्मचारी अनिल धर्माधिकारी यांचे ते वडील होत. वृद्धापकाळाने आज दि. 29 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने धर्माधिकारी कुंटुंबावर कोसळलेल्या या दुःखात........... दै.परिवार सहभागी आहे.

उद्या अंत्यविधी

     दरम्यान, रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी  यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार, दि.30.12. 2023 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10:00 वा

राहते घर गोपनपाळे गल्ली, आंबेवेस  परळी वैजनाथ येथुन अंत्ययात्रा निघेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या