जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या लेखी आश्वासनानंतर परळी बंद मागे

 आज 'परळी बंद नाही' !



जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या लेखी आश्वासनानंतर परळी बंद मागे

 पो.नि.कदम यांच्यावर कारवाईसाठीचे गवळी यांचे उपोषणही स्थगित

परळी /प्रतिनिधी

  बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुक्ताराम गवळी मारहाण प्रकरणाचा तपास व चौकशी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेहरकर मॅडम यांच्याकडे देत असल्याचे लेखी पत्रानंतर  आजचा परळी बंद मागे घेण्यात आला आहे. तसेच  सामाजिक कार्यकर्ते तथा इंजेगावचे माजी उपसरपंच मुक्ताराम गवळी यांचे मारहाण करणाऱ्या  पो.नि. हेमंत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषणही स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान बंदला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्ष सामाजिक संघटना व संस्थेचे आणि कार्यकर्त्यांचे बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

    मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी बौद्धजन संघर्ष समिती परळी तालुक्याच्या वतीने परळी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

      मुक्ताराम गवळी हे परळी तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील बौद्ध समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत.तसेच अनेक वर्ष उपसरपंच होते.ते  दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी फिर्यादी राहुल आश्रुबा झिंजुर्डे यांच्या शेतातील सोयाबीन चोरून नेणारा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत परळी ग्रामीण स्टेशनला गेले होते. यावेळी  तक्रार तब्बल सात ते आठ तास दाखल करून घेण्यात आली नाही.

    रात्री 9 च्या  दरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत कदम हे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आले. त्यावेळी फिर्यादी राहुल झिंजुर्डे फिर्याद देत असतानाच हेमंत कदम यांनी मुक्ताराम गवळी यांना तू कोण, तुझी लायकी काय? माझ्यासमोर बसण्याचे तुझी लायकी नाही.असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. व पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलले. एवढ्यावरच न थांबता गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गवळी यांनी पोलिस महासंचालक औरंगाबाद, जिल्हा पोलिस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबाजोगाई यांना तक्रार केली.तसेच शहर पोलीस स्टेशन परळी येथे हेमंत कदम यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दिनांक 7डिसेंबर रोजी अर्ज दिला होता.

     याप्रकरणी पोलिस महासंचालक औरंगाबाद, जिल्हा पोलिस अधीक्षक बीड, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई, उपजिल्हाधिकारी कार्यालय परळी,शहर पोलीस स्टेशन परळी यांना निवेदन दिले.दिलेल्या अर्ज, पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही म्हणून अखेर दिनांक 20 डिसेंबर पासून  परळी शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.उपोषणाला पाच  दिवस झाले परंतू प्रशासनाने दखल घेतली नाही. कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बौद्ध जन संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते.

    दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी रात्री 9 वाजता लेखी पत्र दिले आहे. हेमंत कदम यांच्यावर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अंबाजोगाई कविता नेहरकर यांच्याकडे तपास दिला आहे. तसेच संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्रानंतर उपोषण व बंद मागे घेण्याचे विनंती केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आल्याचे मुक्ताराम गवळी यांनी म्हटले आहे. तर आजचा बंद मागे घेत असल्याचे बहुजन संघर्ष समितीच्या वतीने म्हटले आहे. या बंदसाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचा तसेच संघटनांचा बहुजन संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार