रासेयोच्या शिबिरातील शिदोरीचा जीवनात वापर करावा - नाईकनवरे
रासेयोच्या शिबिरातील शिदोरीचा जीवनात वापर करावा - नाईकनवरे
![]() |
उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून रोहित कांबळे याला स्मृतिचिन्ह देताना मान्यवर |
परळी वै. (प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष शिबीराचे आयोजन मौ. मिरवट येथे करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी श्रमदान करत विविध समाज उपयोगी कार्य पार पाडले. या शिबिरांतर्गत मिरवट येथील ग्रामस्थांना जल संरक्षण व पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात जनजागृती केली. समारोपाच्या प्रसंगी न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी.ए. नाईकनवरे यांनी स्वयंसेवकांना विशेष शिबिरादरम्यान आलेल्या अनुभवाच्या शिदोरीचा प्रत्यक्ष जीवनात वापर करून समाजाला त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. यावेळी मंचावर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अजय भैय्या सोळंके, उपप्राचार्य सुनील लोमटे, प्रा. डॉ.बी.आर. चव्हाण प्रा. रविशंकर स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अंकुश वाघमारे यांनी तर प्रास्ताविक प्रा. डॉ. बी.आर. चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वृंद व राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
● युट्यूबवर आवश्य पहा :
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा