आंदोलनाचा "शताब्दी दिन" विविध उपक्रम राबवून साजरा

 कौडगाव हुडा फाटा येथील बेमुदत धरणे आंदोलनचा १०० वा दिवस





आंदोलनाचा "शताब्दी दिन" विविध उपक्रम राबवून साजरा 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

तालुक्यातील कौडगाव हुडा फाटा येथील  बेमुदत धरणे आंदोलनास १०० दिवस पूर्ण झाले. आंदोलनाचा शताब्दी दिन साजरा करत विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना १०० तोफांची सलामी देण्यात आली. कुणबी  नोंदी मिळण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून प्रत्येक गावातील समजबांधवांचे दहा ते पंधरा अर्जाचे नमुने भरून घेण्यात आले. तसेच  "२० जानेवारी.. मुंबई वारी".. नाव नोंदणी फार्म भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. "२० जानेवारी.. मुंबई वारी"..फॉर्मवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची स्वाक्षरी घेऊन नोंदणी फार्मचे प्रकाशन करून हा फॉर्म प्रत्येक गावात पाठवण्यात येणार आहेत.

          परळी तालुक्यातील कौडगाव हुडा फाटा येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२३ पासून बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या या आंदोलनाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन तात्काळ मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत.

 मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मराठा योद्धा मा.मनोज जरांगे पाटील यांनी कौडगाव फाटा येथील आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांसह सकल मराठा समाजबंधवांना मार्गदर्शन केले होते. मा.मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहित झालेले येथील आंदोलनकर्ते आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

          बेमुद्दत धरणे आंदोलनास आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने आंदोलनाचा "शताब्दी दिन" विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील २१ गावातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार