दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन

 दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन



विश्‍वास, विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अंबाजोगाईकरांनी व बँकेच्या सर्व सभासदांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून व्याख्यानमालेचा सहकुटूंब, सहपरिवार लाभ घ्यावा असे नम्र आवाहन बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
आर्थिक क्षेत्रात कार्य करीत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो. याच जाणिवेने अंबाजोगाईकरांना मागील 21 वर्षांपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या उपक्रमाचे हे 22 वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत आजपावेतो सदर व्याख्यानमालेत अनेक थोर विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, इतिहास संशोधक, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी रसिकांना वैचारिक मेजवानी देवून वेळोवेळी आपले अनमोल विचार मांडलेले आहेत. यावर्षी ही युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त 10 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान दररोज सायंकाळी 6.30 वाजता (तीनही दिवस) खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, कुत्तर विहिर, अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित व्याख्यानमालेसाठी बुधवार, दि.10 जानेवारी रोजी ह.भ.प.शिरीष महाराज मोरे (देहु) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय "शिवराज्याभिषेकाची 350 वर्षे" असा आहे. ह.भ.प.मोरे हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान 11 वे वंशज आहेत. ते प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, शिवव्याख्याते ही आहेत. भक्ती-शक्ती हा त्यांच्या चिंतनाचा मुख्य विषय आहे, आजपावेतो त्यांनी विविध ठिकाणी शेकडो व्याख्याने दिली आहेत. ते गडकोटप्रेमी आहेत. त्यांनी 100 पेक्षा जास्त किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. ते युवा लेखक, साहित्यिक असून त्यांचे शिवराज्याभिषेक हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिवराज्याभिषेकानिमित्त प्रकाशित "छत्रपतींच्या कर्तृत्वाची नीती" या पुस्तिकेचे ते लेखक म्हणून ही ओळखले जातात. शिवशंभू विचार मंच, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे ते काम पहातात.
      गुरूवार, दि.11 जानेवारी रोजी डॉ.पांडुरंग बलकवडे (पुणे) यांचे ‘लोककल्याणकारी शिवराय व त्यांची राजनीती’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ.बलकवडे हे ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्र व्याख्याते, मोडी लिपी तज्ज्ञ, पुरातत्ववेत्ते, दुर्ग अभ्यासक म्हणून ही सर्वदूर ओळखले जातात. ते भारत इतिहास संशोधक मंडळ, महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम मंडळ (बालभारती), किल्ले रायगड विकास प्राधिकरण, गडकोट किल्ले संवर्धन आणि विकास समिती, महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्य संयुक्त तंजावूर मोडी प्रकल्प, बाजीराव समाधी स्मारक विकास समिती, रावेरखेडी (मध्यप्रदेश), श्री छत्रपती शिवाजी स्मारक समिती, श्रीशैलम, आंध्रप्रदेश.,इतिहास विषयक सल्लागार समिती, महादजी शिंदे स्मारक समिती, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती, छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती, लाल महाल उत्सव समिती, राष्ट्रीय पानिपत स्मृती समिती, ठाणे मुक्ती दिन उत्सव समिती, संस्कार भारती या संस्था, समितीच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळ आणि पेशवे दफ्तर, पुणे येथील हजारो मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून त्या आधारे मराठ्यांच्या इतिहासावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले., पुण्यातील प्राचीन पुण्येश्वर व नारायणेश्वर मंदिरांच्या अवशेषांचा शोध घेऊन ते जगासमोर आणले. तसेच कसबा पेठेत चौथ्या शतकातील प्राचीन विष्णू मुर्तीचा शोध घेऊन ती जगासमोर आणली आणि प्राचीन मानवी वस्तीच्या अवशेषांचा शोध घेऊन ते प्रथम जगासमोर आणले. त्यानंतर डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून झालेल्या उत्खननामध्ये डॉ.शरद राजगुरू, डॉ.वसंत शिंदे, डॉ.प्रमोद जोगळेकर यांच्याबरोबर भाग घेतला. त्या संशोधनावर आधारित शोधनिबंध प्रसिद्ध झाला. भारतीय सेनेच्या दक्षिण कमांड मुख्यालयात 40 वर्षे सेवा उत्कृष्ट सेवेबद्दल आर्मी कमांडर ऍवॉर्डसह श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार, जनसेवा पुरस्कार, विश्व हिंदू परिषद धर्मरक्षा पुरस्कार, राष्ट्रवादी काँग्रेस समाजगौरव पुरस्कार, सावरकर स्मृती पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार, मान- सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांची प्रसिद्ध ग्रंथसंपदा -अठराव्या शतकातील हिंदवी स्वराज्य, स्वराज्यरक्षणाचा लढा, पानिपत - 250 स्मृती ग्रंथ, राजाराम महाराज समाधी इतिहास, ढमढेरे घराण्याचे मराठ्यांच्या इतिहासातील योगदान अशी आहे. बँकेच्या वतीने दि.11 जानेवारी रोजी सहकार भारती स्थापना दिवस ही साजरा करण्यात येईल.
     या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, दि.12 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा व्याख्याते राहुल सोलापूरकर (पुणे) यांच्या ‘श्रीराम जन्मभूमी - इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. राहुल सोलापूरकर यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात आंतर शालेय नाट्य स्पर्धेतून केली. वक्तृत्व, कथाकथन, अभिनय, व्याख्यान, निवेदन, ध्वनिमुद्रण, संगीत संयोजन, जाहिरात, नाटक, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन या सर्वच ठिकाणी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली आहे. अनेक शॉर्ट फिल्म, जाहिरातींची निर्मिती केली आहे. ते कायमच सामाजिक कार्यात पुढाकार घेतात. 14 वेगवेगळ्या संस्थांवर ते विश्वस्त म्हणून ही काम पहातात. 2012-13 या एकाच वर्षात त्यांनी "स्वामी विवेकानंद" या विषयावर 101 व्याख्याने दिली आहेत हे विशेष होय. 100 मराठी चित्रपट, 5 हिंदी चित्रपट, 22 हौशी नाटके, 25 व्यावसायिक नाटके, 31 टिव्ही सिरीयल्स मधून दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. सोलापूरकर यांनी साकारलेली "राजर्षी छत्रपती शाहू महाराज" यांची भूमिका विशेष गाजली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार, मान - सन्मान प्राप्त झाले आहेत. 12 जानेवारी रोजी युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती बँकेच्या वतीने साजरी येईल.

     अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक, श्रोते, नागरिक, माता, भगिनी आणि युवक वर्गाने सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला - 2024 चा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख, संचालिका मा.सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पालवे), संचालक श्री.रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, राजाभाऊ दहिवाळ, इंजि.बिपीन क्षिरसागर, प्राचार्य किशन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक अशोक कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक भिमा ताम्हाणे व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर तसेच सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारीवृंद यांनी बँकेच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पञकाद्वारे केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !