इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांची निवड




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या 6 व्या  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी  कै. रामभाऊ (आण्णा) खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांची निवड करण्यात आली असल्याची  माहिती संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

      परळी येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी साप्ताहिक शिक्षण मार्ग आयोजित मराठवाडा विभागीय पातळीवरील शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.यापूर्वी पाच शिक्षक साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत. सहाव्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक तथा बीड जिल्हा शिक्षक संघटनेचे  अध्यक्ष ए.तु. कराड आहेत. तर स्वागत अध्यक्ष पदाची धुरा प्रदीप खाडे हे सांभाळणार आहेत ते  कै. रामभाऊ आण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत. बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्रदीप खाडे यांचे मोठे योगदान आहे.

   परळी येथील औद्योगिक वसाहत सांस्कृतिक सभागृहात 6 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन पार पडणार आहे.या एकदिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन कथाकथन परिसंवाद आणि कवी संमेलन तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!