परळी मतदारसंघास 40 कोटी

 पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून जिल्ह्यातील विद्युत वितरणास बळकटी, जिल्ह्यातील तीन उपविभागातील फिडरच्या कामांना 153 कोटींचा निधी




परळी मतदारसंघास 40 कोटी


परळी वैद्यनाथ (दि.06) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विद्युत वितरणास बळकटी देण्यासाठी केज, माजलगाव व परळी उपविभागतील 60 उपकेंद्रांच्या अंतर्गत 152 फिडरच्या कामांना आरडीएसएस योजनेतून तब्बल 153 कोटी 71 लाख रुपये इतका निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला आहे.


परळी मतदारसंघात यांतर्गत परळी व अंबाजोगाई उपविभागासाठी सुमारे 40 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून देण्यात आला असून, यांतर्गत 11 केव्ही क्षमतेचे फिडर बसवण्यात येणार आहेत. यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. 


परळी मतदारसंघातल्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, पूस, हतोला, गिरवली, बाभळगाव, सायगाव, मुर्ती, पोखरी, जवळगाव, मोरेवाडी, भारज, राडी, अकोला, देवळा तसेच परळी तालुक्यातील हाळम, लाडझरी, सोमेश्वर नगर, रतनेश्वर नगर, कपिलेश्वर, इंजेगाव, बेलेश्वर, धामुनी, जयगाव, जीवनापूर, गोवर्धन, आचार्य टाकळी, कानडी, पिंप्री, हिवरा, बोरखेड, तेलसमुख, सिरसाळा, रेवली, वाका, खामगाव, साळेगाव, कांनापुर, कन्हेरवाडी या फिडरच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. 


याशिवाय केज उपविभागत 21 सबस्टेशन अंतर्गत 51 फिडर साठी 52 कोटी तसेच माजलगाव उपविभागतील 21 सबस्टेशन अंतर्गत सर्वाधिक 59 फिडरसाठी 60 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार