युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

राज्याच्या 5% निधी बीड जिल्ह्यात! मंगळवार पासून होणार लाभाचे वितरण

 कृषीमंत्री धनंजय मुंडेंमुळे कृषी अभियांत्रिकीकरण योजनेतील 314 लाभार्थींना 2 कोटी रुपये निधी मंजूर


राज्याच्या 5% निधी बीड जिल्ह्यात! मंगळवार पासून होणार लाभाचे वितरण


बीड (दि. 20) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यातील ट्रॅक्टर व अन्य औजारांच्या प्रलंबित 314 लाभार्थींच्या सुमारे 2 कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली असून, डीबीटी द्वारे हा निधी बीड जिल्हा कृषी विभागास प्राप्त झाला आहे. 


जिल्ह्यातील ट्रॅक्टरच्या 94 तर अन्य ट्रॅक्टर चलीत औजारांच्या 220 मागण्या अशा एकूण 314 लाभार्थींच्या सुमारे 2 कोटी रुपये निधीचे वितरण मंगळवार पासून थेट लाभार्थींना करण्यात येणार आहे. 


कृषी अभियांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ट्रॅक्टर सह रोटावेटर, पलटी नांगर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, कडबा कुटी, पाचट कुटी, मोगडा आदी औजारांसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतून मंजूर अनुदानाच्या सुमारे 5% अनुदान यावर्षी एकट्या बीड जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.


बीड हा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा असून कृषी खात्यांतर्गत सर्व योजनांचा लाभ राज्या सोबतच बीड जिल्ह्याला ही सर्वाधिक मिळावा यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. यापूर्वीही पिक विमा असो व अन्य योजनांच्या माध्यमातून सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्याला मिळालेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या