मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले

 मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले



धारूर, 

धारूर तालुक्यातील आवरगाव येथील  गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्ष 50 यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार चाल ढकल करत आहे या ताना मधून 1 जानेवारी सोमवार रोजी दुपारी तीन वाजेला मराठा आरक्षण देत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून शेतामधील बोरीच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपवले.

मराठा आरक्षणासाठी कित्येक आंदोलने झाले साखळी उपोषण गावोगावी करत आहेत तरी सरकार मनावर घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने धारूर तालुक्यातील आवरगाव येथील शेतकरी गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्षे 50 यांनी त्यांच्या शेतामध्ये बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे मुख्य कारण हे मराठा आरक्षण असून त्यांचा मुलगा व सून उच्चशिक्षित असून त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही हे डोक्यात घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे व त्यांनी आत्महत्या करत असताना चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीत त्यांनी असे लिहिले आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून सरकार त्यांना तारखेवर तारीख देत असून आरक्षण देत नसल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे तारखेवर तारीख देत आहेत व २०तारखेपर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी विनंती सरकारला केली आहे तसेच आत्महत्यासाठी मी कोणालाही दोषी ठरवत नसून फक्त सरकारने मराठा आरक्षण द्यावे याकरिता मी माझे जीवन संपवत आहे. असे लिहिले आहे त्यांच्या या जाण्याने आवरगाव हसनाबाद धारूर सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पाश्चात्य मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार