जोरदार घोषणाबाजी : कामगारांचा मोठा सहभाग

विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा धडकला परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


जोरदार घोषणाबाजी : कामगारांचा मोठा सहभाग


परळी वैजनाथ: परळी तालुक्यातील बांधकाम कामगारांचा परळी येथे  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उपकार्यालय सुरू करावे या प्रमुख मागणीसह इतर न्याय मागण्यांसाठी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आज (8 जानेवारी) रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला. 


 बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी. खाडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला परळी येथील बांधकाम कामगारांना  कागदपत्र पडताळणीसाठी बीड येथील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयात जावे लागते. बीड परळीपासून 100 किमी असल्यामुळे कामगारांचा पूर्ण दिवस जातो. 100 किमी दुर व किमान 500 रु.खर्च होतो. बांधकाम कामगारांचा वेळ वाचावा व खर्चही वाचावा म्हणून परळीला तसेच प्रत्येक तालुक्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ उपकार्यालय सुरू करावे अशी संघटनेची मागणी  आहे.ग्रामविकास मंत्रालयाचे जी आर, कामगार आयुक्त कार्यालयाचे जी आर व बीड येथील मुख्यकार्यकारी अधिकारी (सीइओ) चे सर्व ग्राम सेवकांना आदेश असूनही  अनेक ग्रामसेवक बांधकाम कामगारांना मात्र नोंदणीसाठी मागील वर्षी ९० (नव्वद) दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देत नाहीत. 26 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य कार्यकारी अभिकारी यांनी बीड जिल्ह‌यातील सर्व ग्रामसेवकांना आदेश काढलेले आहेत. परळी तालुक्यातील ग्रामसेवक प्रमाणपत्र देत आहेत परंतु काही ग्रामसेवक जाणीवपूर्वक  देत नाहीत. अशा ग्रामसेवकांना निलंबित करावे अशी संघटनेची मागणी आहे. 

         शहरातील तीन इ -श्रमकार्ड धारकांचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे त्यांना मदत मिळावी म्हणून अर्ज भरून  एकवर्ष झाले तरी कामगारांच्या वारसांना लाभ मिळालेला नाही. वारसांना दोन लाख रूपये मिळाले पाहीजेत ही संघटनेची मागणी आहे.बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांनाच शिष्यवृत्ती मिळते मात्र काही बांधकाम कामगारांना दुसऱ्यांदा जुळे झाल्याने  मुलांची संख्या तीन झालेली आहे.अशा तीन मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. मेडिक्लेम योजना सुरू करा, भोजन, सुरक्षाकिट, भांडे संचऐवजी नगदी रक्कम कामगारांच्या खात्यात टाकावी. अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला. यावेळी प्रा बी जी खाडे,डॉ अशोक थोरात, किरण सावजी,प्रशांत कसबे,ओम पुरी,जालिंदर गिरी, शेखजावेद,प्रकाश वाघमारे,बाबासाहेब रोडे,शेख अजहर,मुजाजी तळेकर, रामकिशन खात्री,याशीन शेख, संजय कसबे,पंडीत सरवदे,अर्जुन सोळंके, शेख इस्माईल आदींसह मोठ्याप्रमाणात  कामगार  षहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !