परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने दर्पण दिन साजरा

 परळीतील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी व्यापक प्रयत्न करु - मोहन व्हावळे


व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने दर्पण दिन साजरा

परळी (प्रतिनिधी) दि.6 - परळी शहर तालुक्यात सक्रिय असणार्या पत्रकारांना घरे व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी नोंदणीकृत असलेल्या सदस्यासह नविन सदस्यांना समाविष्ट करुन पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी व्यापक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन परळी पत्रकार संघ मर्या.परळीचे अध्यक्ष मोहन व्हावळे यांनी केले.व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने दर्पण दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

   

दर्पण दिनानिमीत्त व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने शनिवार दि.6 जानेवारी रोजी जीजामाता उद्यानात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यानिमीत्त सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दर्पणदिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना परळी पत्रकार संघ मर्या.चे अध्यक्ष मोहन व्हावळे म्हणाले की,परळीतील पत्रकारांना आपल्या हक्काचे घर असावे यासाठी परळीतील आम्ही पत्रकारांनी रजिस्टर संस्था स्थापन करत गृहनिर्माण संस्थेसाठी परळी नगरपालिकेकडुन नंदागौळ मार्गावरील जुन्या कचरा डेपोची जागा मंजुर करुन घेतली.परंतु काही कारणास्तव याबाबत पुढील प्रक्रिया पुर्ण होवु शकली नाही.


Click:■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*


परळी शहरातील पत्रकारांच्या घरांचे प्रश्न बिकट बनत चालले असल्याने आगामी काळात रजिस्टर असलेल्या संस्थेतील सदस्य व गृहनिर्माण संस्थेसाठी शहरातील सक्रिय असणार्या पत्रकारांना नव्याने सदस्य करुन गृहनिर्माण संस्थेचा प्रश्न मार्गी लावु असे सांगितले.यावेळी पत्रकार दत्तात्रय काळे यांनी मराठी भाषेतील पहिले वृतपत्र सुरु करणार्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले.यावेळी व्हाईस ऑफ मिडीया महिला प्रदेशाध्यक्ष सुकेशनी नाईकवाडे,परळी तालुकाध्यक्ष स्वानंद पाटिल,धनंजय आढाव,संजीव रॉय,संभाजी मुंडे,किरण धोंड,महादेव शिंदे,संतोष जुजगर,बालाजी ढगे,विकास वाघमारे आदी उपस्थित होते.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!