शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 राजमाता जिजाऊंचे  कार्य प्रेरणादायी-नारायण सातपुते


राजमाता जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती-भोजराज पालीवाल


शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी


परळी (प्रतिनिधी)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती आज 12 जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथील जिजामाता उद्यान येथे आज शुक्रवारी राजमाता मासाहेब जिजाऊ  यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ  यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन श्री सातपुते पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री नारायण सातपुते म्हणाले की, आजच्या युवकांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्यापासून शिकण्यासारखे खूप काही आहे. नियोजनबद्ध आखणी, वास्तविकता व ध्येयप्राप्ती अशा अनेक महत्वपूर्ण बाबी त्यांच्यापासून शिकता येतील. आजच्या युवकांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान अभ्यासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री भोजराज पालीवाल यावेळी म्हणाले की, लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले.शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. त्यामुळे, जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास शिवसेना ऊपजिलाप्रमुख नारायण सातपुते शिवसेना तालुका प्रमुख भोजराज पालीवाल शहर प्रमुख राजेश विभूते विधानसभा समन्वय विधानसभा संघटक सतीश जगताप  तालुका उपप्रमुख महेश केंदे तालुका सचिव प्रकाश सालूखे माजी तालुका प्रमुख जगनाथ सोंलखे बबनराव डिमंडे विजय जाधव बालाजी नागरगोजे यांच्यासह परिसरातील व्यापारी, नागरिक व तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !