इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

वैद्यनाथ इन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग परळी वै येथे क्रांतीज्यांती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 वैद्यनाथ इन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग परळी वै येथे क्रांतीज्यांती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

           क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वैद्यनाथ इन्स्टीटयूट ऑफ नर्सिंग परळी वै येथे दि. ०३/१०/२०२४ रोजी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष  डॉ. सूर्यकांत मुंढे यांच्या शुभहस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले.


      यावेळी प्रशासकीय अधिकारी  शेख सर, प्राचार्या गुणप्रिया चोपडे ,  सतीश सर व सर्व शिक्षक वृन्दांच्या उपस्थित विद्यार्थिनींची भाषणे झाली. भाषण, पोवाडा, एकपात्री नाटक इ. स्वरूपात सावित्रीबाईंचा जीवन पट मनांवर उठवला गेला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी व स्टाफमेंबर्सनी रक्तदान केले. श्रीमती. ताई परळीकर यांनी सूत्रसंचालन केले व  राम होळंबे सरांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या