अंबाजोगाई शहरात तरुणाचा संशयस्पद मृत्यू : नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

 अंबाजोगाई शहरात तरुणाचा संशयस्पद मृत्यू : नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या



अंबाजोगाई( प्रतिनिधी )- 


अंबाजोगाई शहरातील परळीवेस भागात साठे नगर आहे येथील ईश्वर अरुण जोगदंड वय 31 वर्ष रात्री येल्डा रोड लगत असणाऱ्या अजमेर नगर परिसरात या इसमाचा संशयास्पद मृत्यू झाला सकाळी सदरील मृतदेह रस्त्यावर आढळून आल्याने शहरात खळबळ माजली होती नातेवाईकांनी ईश्वरच्या मृत्यूस कारणीभूत आरोपीवर गुन्हा दाखल करावा यासाठी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला आहे पोलीस काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे


            अजमेर नगर परिसरात घडलेल्या या भयान घटनेची माहिती परिसरातील कोणत्याही नागरिकांनी पोलिसांना दिली नाही मात्र सकाळी ग्रामीण भागातून येणाऱ्या दूध विक्रेत्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले शव शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला मात्र नातेवाईक अगोदर ईश्वर च्या मृत्यूस कारणीभूत आरोपीवर गुन्हा दाखल करावा म्हणून ठाम होते नातेवाईकांनी व इतर नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता


        पोलिसांनी संतप्त जमाव आक्रमक होत असल्याने शांत करण्यासाठी तात्काळ  मयताच्या नातेवाईकांचा जवाब नोंदवून घेण्यास सुरुवात केल्यामुळे जमलेला जमाव शांत झाल्याचे समजते दुपारपर्यंत जवाब नोंदविण्याचे सुरू काम सुरू होते 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार