वार्षिक सोहळा:सारडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण

 वार्षिक सोहळा:सारडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
     तालुक्यातील सारडगाव येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होणारा वार्षिक सोहळा गुरुवार दिनांक 18 जानेवारीपासून सुरू झाला आहे. या अनुषंगाने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. त्याचबरोबर संत केदारी महाराज यांचा पालखी सोहळा होणार आहे.
         सारडगाव येथे गुरुवार दि 18 जानेवारी ते बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व पालखी सोहळा होणार आहे. या सप्ताहात परंपरेप्रमाणे काकडा आरती,श्री विष्णु सहस्रनाम,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, भावार्थ रामायण,प्रवचन,धुपारती, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन,हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहात हभप श्रीनिवास महाराज घुगे आळंदी दे.,श्री.ह.भ.प.डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे नाशिक,श्री. ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर नाना,
श्री.ह.भ.प. संजय महाराज पाचपोर अमरावती,श्री.ह.भ. प. अनिल महाराज पाटील बार्शी, श्री.ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांची किर्तनसेवा होणार आहे.तर बुधवार दि.24 रोजी दुपारी १२ ते २ पुजेचे कीर्तन श्री.ह.भ.प. विष्णु महाराज उखळीकर व रात्री ९ ते ११ श्री. ह.भ.प. महादेव महाराज राऊत बीड यांचे कीर्तन होईल. दि.२५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ काल्याचे कीर्तन ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज उखळीकर यांचे होणार आहे.मंगळवार, दि.२३/१/२०२४ रोजी श्री संत केदारी महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र उखळी (बु) येथुन सकाळी १० वा. सारडगावकडे प्रस्थान होणार आहे.
        या पारंपारिक व वार्षिक सोहळ्यात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गावकरी मंडळ सारडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार