अवघे परळी वैजनाथ भक्ती रसात निघाले न्हाऊन

 अद्वितीय-अभूतपूर्व : परळी वैजनाथमध्ये रामरायाच्या स्वागताला  उसळला जनसागर




सर्व रामभक्त खासकरून महिला वर्गाचे लोकोत्सव समिती पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथच्यावतीने विशेष आभार


अवघे परळी वैजनाथ भक्ती रसात निघाले न्हाऊन


परळी वैजनाथ मध्ये प्रथमच प्रचंड संख्येने महिलावर्ग सहभागी : वैद्यनाथ नगरी परळी वैजनाथ राममाय


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कलियुगातील तब्बल साडे पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत मूर्त स्वरूपात विराजमान होत आहेत. या अनुषंगाने पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ लोकोत्सव समितिच्या वतीने भव्य शोभा यात्रा रविवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी  ९:३० वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिरा परिसरातून निघाली. या सोहळ्यात तब्बल तीस हजार रामभक्त सामील झाले. यात केशरी, भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. सर्व रामभक्त खासकरून महिला वर्गाचे लोकोत्सव समिती पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथच्यावतीने विशेष आभार मानले गेले आहेत. शोभायात्रेत कोणत्या रामभक्त महिलेने फुगडी खेळली कोणी पावली खेळली कोणी टाळ, मृदंग, डोल, शंख वाजवले तर कोण्या रामभक्त पुरुषांनी लाठीकाठी खेळली. कोण राम, लक्ष्मण, सीता, हनुमान झाले. तर इतर रामभक्त महिला भजनी मंडळ तसेच वारकरी लोकांचा उत्साह नोंद घेण्यासारखा होता.


सर्व भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेल्या रामायणामधील अयोध्येतील श्रीराम मंदिरात तब्बल साडे पाचशे वर्षांनी प्रभू श्रीरामांची न्याय व्यवस्थेच्या आदेशानुसार प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात एकप्रकारे दिवाळी सारखे वातावरण तयार झाले आहे. शहरात जागोजागी शोभयात्रा मार्गावर रांगोळी काढली गेली तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली.


या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपल्या घरांवर तसेच व्यापारी बांधव आपल्या घरासह दुकानांवर भगवे झेंडे लावले तर कोणी गुढ्या उभारल्या आहेत तसेच विद्युत रोषणाई (लायटिंग) करून आनंदोत्सव द्विगुणीत केला. शोभायात्रेत सहभागी होताना रामभक्तांनी आवर्जून भगवे, केशरी, लाल वस्त्र परिधान केले. परळी वैजनाथ मधील सर्व व्यापारी वर्गाने शोभायात्रा संपन्न होईपर्यंत व्यवहार स्थगित ठेऊन मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी होऊन लोकोत्सव साजरा केला.

या मार्गावरुन निघाली शोभायात्रा

शोभा यात्रा मार्ग : प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसर - नेहरू चौक (तळ) - राणी लक्ष्मीबाई टॉवर - बाजार समिती (मोंढा मार्केट) - महर्षी वाल्मिकी चौक - बस स्टँड - छत्रपती शिवाजी महाराज चौक


प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर

◆ नगरपालिकेने शहरांत विविध ठिकाणी करणार लायटिंग केली तसेच शहरात विशेष स्वच्छ मोहीम राबविली.

◆ वैद्यकीय इमर्जन्सी विचारात घेता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात यंत्रणा सज्ज होती,  शोभायात्रे दरम्यान दोन रुग्णवाहिक उपलब्ध होत्या. प्रभू रामचंद्र कृपेने काहीही अघटित घडले नाही.

◆ २१ व २२ जानेवारी रोजी अखंड विद्युत पुरवठा देण्यासाठी महावितरण कंपनी सज्ज आहे.

◆ सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनही सुसज्ज, बी एस एफच्या ३ कंपन्यांसह तगडा बंदोबस्त होता.

◆ जागोजागी  रामभक्तांनी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी केली तसेच ठिकठिकाणी खिचडी (डाळ / साबुदाणा), पाणी, फळवाटप तसेच राजगिरा लाडू सोबत विविध खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार