● अभिष्टचिंतन:प्रदीप खाडे यांचा विशेष लेख>>>>अनेक तरूणांच्या हाताला काम देणारे उद्योजक: व्यंकटेश (पापा) मुंडे

 अनेक तरूणांच्या हाताला काम देणारे उद्योजक:  व्यंकटेश (पापा) मुंडे 



...........................................

      नम्रता, शिष्टाचार आणि राहणीमान आदी गोष्टींचं कौशल्य असल्याशिवाय यशस्वी उद्योजक होता येत नाही. उद्योजक होण्यासाठी बाजारपेठेची माहिती असणे गरजेचे असते. या सर्वच गुणांसह अनेक गुणांचा संगम असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आघाडीचे युवा उद्योजक  व्यंकटेश पापा मुंडे...

           आजच्या तरुण पिढी आणि उद्योजकांसाठी आदर्श निर्माण करणारे आहेत. भेल सेकंडरी स्कूलमध्ये (परळी वैजनाथ) व्यंकटेश पापा मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर वैद्यनाथ महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. विद्यापीठातून बीबीए पदवी पूर्ण केली. अतिशय उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी आपली  ग्रामीण भागातीशी नाळ कायम ठेवली. आपण ज्या भागाचे नेतृत्व करतो त्या ग्रामीण भागासाठी काहीतरी करता आले पाहिजे ही त्यांची कायम तळमळ असते. ही तळमळ केवळ बोलण्यातून नाही तर त्यांच्या कृतीतून दिसुन येते हे विशेष. 

     सामाजिक आणि राजकीय जान असलेल्या व्यंकटेश उर्फ पापा मुंडे यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड. शहरातील कोणत्याही क्रिकेट स्पर्धा असोत त्यामध्ये त्यांची क्रिकेट बद्दलची ओढ लक्षात येणारच. प्रत्येक स्पर्धेला त्यांचे सहकार्य हमखास राहतेच.वेगवेगळे उद्योग सांभाळत ते आपले क्रिकेटप्रेमही जोपासले आहे. म्हणूनच त्यांचा प्रवास क्रिकेटर ते यशस्वी उद्योजक असा झाला आहे. तो कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय सुध्दा आहे.

      दुचाकी जगतात तरूणांना वेड लावणार्या बुलेट गाड्यांचे शोरूम त्यांनी परळीत सुरू केले. टाटा मोटर्ससह इतरही  शोरूमचे त्यांनी यशस्वीपणे कामकाज हाताळले आहे. त्यामुळे परळीतील शौकिनांना खरेदीची हौस भागवण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही. तरूणांना शारिरीक आरोग्याची आवड निर्माण व्हावी म्हणून व्यंकटेश मुंडे यांनी शहरात सेव्हन फिटनेस जीम सुरू केली आहे. परळी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नव नवीन व्यवसाय आणण्याचा प्रयत्न असतो. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चिकाटी आणि जिद्द आवश्यक असते चिकाटी आणि जिद्द या शब्दांचे प्रतिरूप म्हणजे उद्योजक व्यंकटेश मुंडे आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. 

       घरात सर्व वातावरण हे शैक्षणिक, त्यामुळे कुणी उद्योजक होणे शक्य नव्हते. असे असतानाही व्यंकटेश मुंडे यांनी क्षेत्राकडे पाऊल ठेवले. कुटुंबातील सदस्यांनीही या वेगळ्या क्षेत्रासाठी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्याच पाठिंब्याने आणि स्वतःच्या कौशल्याने आज त्यांनी उद्योजक म्हणून आपला ठसा उमटविला आहे. 

          जागतिकीकरणाच्या धोरणामुळे आणि खासगीकरणाच्या वाढत्या गरजेमुळे नोकरी मिळविणे कठीण झाले असताना, अनेक बेरोजगार हातांना काम देण्याचे कार्य व्यंकटेश पापा मुंडे यांच्याकडून होत आहे. त्यांनी काम करण्यापेक्षा अनेकांना काम लावले हे उद्दिष्ट साध्य केले आहे. उद्योग उभारत असताना चढउतार होत असतो. मागणी आणि पुरवठा यामध्ये चढउतार झाल्यामुळे आर्थिक हानी होऊ शकते. परंतु अशाही परिस्थितीत न डगमगता त्यांनी यशस्वी उद्योग केला. अनेकांच्या हाताला काम दिल्यामुळे अनेक बेरोजगारांचा पोटापाण्याचा प्रश्न या माध्यमातून त्यांनी मार्गी लावला. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. अतिशय कठीण परिस्थितीत उद्योग उभारून त्यांनी तो यशस्वी करून दाखविला आहे. खरं उभा करतांना असलेला उत्साह कालांतराने कमी होतो. मात्र याला व्यंकटेश पापा मुंडे हे अपवाद ठरतात. शहरातील तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न मिटला पाहिजे या हेतूने त्यांनी विचार केला. आज त्यांच्यामुळे अनेक हातांना काम मिळाले आहे आणि आगामी काळातही ते आणखी उद्योग ऊभे करतील अशी अपेक्षा.... ! कै. रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थचे सचिव व्यंकटेश (पापा) मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 


- प्रदिप खाडे    

अध्यक्ष : कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्था

सहसचिव : नाथ शिक्षण संस्था, परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !