दुखःद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

 बीड जिल्ह्याचे एक 'वैदिक भूषण' हरवलं :राक्षसभुवनचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ वे.शा.सं. पोपटशास्त्री कालवश





गेवराई ,प्रतिनिधी....
          संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले वेदशास्त्र संपन्न, कर्मठ वैदिक व प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ राक्षसभुवन येथील पोपटशास्त्री चौथाईवाले यांचे आज (दि.5) रोजी सायंकाळच्या सुमारास वृद्धापकाळ व अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील वैदिक क्षेत्रातील एक भूषण हरवले आहे. त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभरातून शोक संवेदना व्यक्त केली जात आहे.
      महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्योतिषकार वैदिकपंडीत, विद्वान मथुरादासशास्त्री (पोपटगुरु) चौथाईवाले राक्षसभुवनकर यांचे निधन झाले आहे. मृत्यू समय ते 74 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली ,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत पोपटशास्त्री हे ज्योतिष शास्त्रामध्ये पारंगत होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातून त्यांची ख्याती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिषतज्ञांमध्ये त्यांना ओळखले जात होते. ठीक ठिकाणाहून त्यांच्या ज्योतिष्यविधीच्या, वैदिक तत्त्वज्ञानाच्या मार्गदर्शनासाठी भाविक त्यांच्याकडे येत असत.एक प्रकांड पंडित व वेदशास्त्राचे तज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती होती. एक कर्मठ, सनातनी वैदिक म्हणून त्यांनी आयुष्यभर आपला लोकाचार व आचरण ठेवले. त्यांना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्हा व महाराष्ट्रभरात आहे.  एक प्रकारे वैदिक क्षेत्रातील बीड जिल्ह्याचे ते भूषणच होते. त्यांच्या निधनाने एक विद्वान व बीड जिल्ह्याचे वैदिक भूषण हरवले आहे.


राक्षसभुवन येथे उद्या अंत्यसंस्कार

दरम्यान, वे.शा सं पोपटशास्त्री यांच्या पार्थिवावर  उद्या दिनांक ०६/०१/२०२४ ,शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता राक्षस भुवन येथे अंत्य संस्कार केले जाणार आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार