ज्ञानदा ग्रुपचा लक्षवेधी उपक्रम: मकरसंक्रांत हळदीकुंकू समारंभात 'घे भरारी' आकर्षक देखावा

 ज्ञानदा ग्रुपचा लक्षवेधी उपक्रम: मकरसंक्रांत हळदीकुंकू समारंभात 'घे भरारी' आकर्षक देखावा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       मकरसंक्रांती निमित्त दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावा सादर करणाऱ्या परळीतील ज्ञानदा ग्रुपचा यावर्षीचा देखावा हा लक्षवेधी उपक्रम ठरला.

  ज्ञानदा ग्रुपने सादर केलेला मकरसंक्रांत हळदीकुंकू समारंभातील अत्यंत दर्जेदार व आकर्षक देखाव्याने परळी शहरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.हा देखावा बघण्यासाठी महिला, नागरिकांनी  प्रचंड गर्दी केली होती.परळीतील महिलांच्या ज्ञानदा ग्रुपच्या वतीने 'घे भरारी- जर्नी ऑफ वुमेन सांयटिस्ट' या थिमवर आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता. इस्त्रो मोहिम, चांद्रयान आदी मोहिमांमध्ये सहभागी वैज्ञानिक महिलांचा यानिमित्ताने सन्मान करण्याच्या दृष्टीने हा देखावा सादर करण्यात आला होता. गेल्यावर्षीही ज्ञानदा ग्रुपच्या वतीने हुबेहुब भिडेवाडा साकारण्यात आला होता.

           ज्ञानदा ग्रुपच्या सौ.माधवी विजय परळीकर, सौ. रोहिणी सचिन जोशी,सौ. वैशाली वाल्मीक मुंडे,सौ. मोहिणी अजय जोशी,सौ. दर्शना अजय साखरे,सौ. मनोरमा स्वप्निल सावजी,सौ. अश्विनी निलेश ढवळे,सौ. ज्ञानेश्वरी जयराम गोंडे,सौ. अनिता संजय वानखेडे, सौ. वैभवी प्रशांत जोशी यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला.



 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !