अयोध्यासाठी धावणार मराठवाड्यातून तीन विशेष आस्था रेल्वे



परळीवैजनाथ/ प्रतिनिधी

अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर मराठवाड्यातून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी तीन रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे.

22 जानेवारी रोजी आयोध्या येथे श्री रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी उत्सव साजरा केला जात आहे.  मराठवाड्यातील भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाने विविध ठिकाणाहून आस्था रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यातून तीन रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. 14 फेब्रुवारी नांदेड येथून नांदेड- आयोध्या (07636) ही विशेष रेल्वे औरंगाबाद मार्गे धावणार आहे. नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, अंकाई, मनमाड, भुसावळ मार्गे ही रेल्वे  अयोध्या येथे पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासात 16 फेब्रुवारी रोजी अयोध्या येथून निघणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद - अयोध्या (07297) ही रेल्वे नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खांडवा मार्गे अयोध्या येथे जाईल. 21 फेब्रुवारी रोजी या रेल्वेचा परतीचा प्रवास होईल. त्याचप्रमाणे 4 फेब्रुवारी रोजी जालना - अयोध्या (07649) ही रेल्वे परभणी, पूर्णा, नांदेड मार्गे धावणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी ही रेल्वे अयोध्या ते जालना (07649)  धावणार आहे. अयोध्यासाठी मराठवाड्यातून तीन रेल्वे गाड्या धावणार असल्याने राम भक्तांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !