सामाजीक कार्यकर्त्या सौ.चंद्रकला कोल्हे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित

 सौ.चंद्रकला कोल्हे राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मानित


परळी (प्रतिनिधी)


 प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाउन कुटुंबाला सावरण्याबरोबरच सामाजीक, धार्मिक व पतीच्या व्यावसायीक क्षेत्रात मोलाचे कार्य करणार्या परळी येथील शिवम शॉपी च्या संचालिका सौ.चंद्रकला वैजनाथअप्पा  कोल्हे यांना राजामाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यस्तरीय जिजाऊरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


  अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ आयोजित राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शुक्रवारी (ता.12) संगम येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व समाजकार्यात सक्रिय सहभाग असणार्‍या महिलांचा कार्यक्रमास व्यासपीठावर श्री क्षेत्र केदारनाथ उत्तराखंड येथील महामंडलेश्वर  साध्वी सुश्री श्री वैष्णवी देवश्री दुर्गा, विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरणकुमार गित्ते,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ.शालिनीताई कराड, परभणी जि.प.च्या माजी अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, माजी सरपंच सौ.वच्छलाताई कोकाटे, चेतना गौरशेटे, राधिका जायभाये, रमाताई आलदे, अ.भा. वारकरी भजनी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.चंद्रकला कोल्हे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देवुन गौरविण्यात आले. परळी येथील मुख्य बाजारपेठेत वैजनाथराव कोल्हे यांचे शिवम शॉपी या नावाने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले दुकान आहे. मागील पंचवीस वर्षांत प्रचंड मेहनत व सचोटीने शिवम शॉपी उभारली आहे. परळी शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी विश्वासाचे ठिकाण शिवम शॉपी आहे. यात वैजनाथ कोल्हे यांच्या बरोबरीने चंद्रकला कोल्हे यांचीही मेहनत व सचोटी आहे. त्यांना एक मुलगा दोन मुली असुन ते उच्च विद्याविभूषित केले आहेत. दोघा पती-पत्नींचा धार्मिक सामाजिक, कार्यात नेहमी सक्रिय सहभाग असतो. सौ चंद्रकला कोल्हे यांनी घर, मुलं व व्यवसायात मदत करीत सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा मौजे संगम येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार