आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिरात सजावट

अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : परळीच्या काळाराम मंदिरात उत्सवाची जोरदार तयारी


आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिरात सजावट 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        येत्या २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असुन या पावनपर्वाच्या अनुषंगाने परळीच्या काळाराम मंदिरात व्याख्यान व धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. विद्युत रोषणाई, पुष्प सजावट, रांगोळ्या, महाप्रसाद अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

       मित्ती पौष शु.१२ शके १९४५ सोमवार, दि. २२/ ०१/२०२४ रोजी  अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.त्यानिमित्त श्री काळाराम मंदिर संस्थान, स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, अंबेवेस, परळी वैजनाथ, जि.बीड. येथे 'एक दिवस श्रीरामासाठी.. रामरक्षा देशासाठी' या विषयावर सकाळी ११:०० वा. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. श्याम महाराज नेरकर (एम.ए., नेट., पी.एच.डी.) (कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वै.) यांचे व्याख्यान होईल.दु.१२:०० वा.भीमरूपी स्तोत्र, हनुमान चालीसा व रामरक्षा-सामूहिक पठण ,दु. १२:३० वा. प्रभु श्रीराम यांची महाआरती दु.०१:०० वा.अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सायं. ६:३० वा.भजन संध्या राधाकृष्ण भजनी मंडळ व अंबिका भजनी मंडळ, परळी वैजनाथ असे कार्यक्रम होणार आहेत. 

      देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रभु श्रीराम स्वागत व लोकोत्सव साजरा केला जाणार आहे.या ऐतिहासिक व राष्ट्रीय अस्मितेच्या पावन पर्वावर  आयोजित या उत्सवात भाविकभक्त ,धर्मप्रेमी ,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री. संस्थान काळाराम मंदिर अंबेवेस, परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार