मॅरेथॉनमध्ये खा. डाॅ. प्रितम मुंडे होणार सहभागी

 नमो चषक : परळीत उद्या मॅरेथॉन, व्हाॅलीबाॅल स्पर्धा 


मॅरेथॉनमध्ये खा. डाॅ. प्रितम मुंडे होणार सहभागी 


परळी वैजनाथ।दिनांक १३।

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उद्या रविवारी नमो चषक २०२४ अंतर्गत मॅरेथॉन व व्हाॅलीबाॅल स्पर्धा होणार आहेत. मॅरेथॉनमध्ये खासदार डॉ.प्रितमताई मुंडे स्वतः सहभागी होऊन स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करणार आहेत. दरम्यान या दोन्ही स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून नाव नोंदणी मोठया प्रमाणात झाली आहे.


  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नमो चषक अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न होत असून एक वेगळाच अनुभव शहरातील स्पर्धक घेत आहेत. उद्या १४ जानेवारीला सकाळी ६.३० वा. पोलीस स्टेशन  येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात होणार आहे. ही स्पर्धा वय वर्षे १५ वर्षापुढील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला व मुली अशा तीन गटात असणार आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धेचा मार्ग नेहरू चौक, फाऊंडेशन स्कूल, दोस्ती टी हाऊस, पाॅवरलुम रस्ता, पोलीस स्टेशन हा आहे तर युवकांसाठी पोलीस स्टेशन, राणी लक्ष्मीबाई टॉवर, रोडे चौक, उड्डाणपूल, एक मिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक व नंतर पोलीस स्टेशन  येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना २ हजार ते ११ हजार रू. पर्यंत रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षीस दिली जाणार आहेत. 

    मॅरेथॉन नंतर दुपारी ३ वा. फाऊंडेशन स्कूलच्या मैदानावर *व्हाॅलीबाॅल स्पर्धा* होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना प्रथम : २१ हजार रू व द्वितीय -११ हजार रू बक्षिस देण्यात येणार आहे. दरम्यान, स्पर्धेसाठी स्पर्धकांनी मोठया प्रमाणात नोंदणी केली आहे. शहरातील क्रीडा शिक्षक देखील यात सहभागी होणार आहेत. तरी

जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असं आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार