परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
उबाठा शिवसेनेत नेमकं चाललंय काय: दोन पिढ्यांपासून शिवसैनिक घरातील कट्टर युवकावर हकालपट्टीची नामुष्की
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत नेमकं काय चाललं आहे ?असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात दिसून येत आहे. अगोदरच बीड जिल्ह्यात संघटनात्मक शक्ती फार मोठी नाही. अशातच पिढ्यानपिढ्या शिवसेनेशी निष्ठावंत राहिलेल्या आणि ज्या लोकांची ओळखच मुळात शिवसैनिक अशी आहे अशा कट्टर नेते, कार्यकर्त्यांना हकालपट्टीची नामुष्की सहन करावी लागत आहे.
'जुने जाऊ द्या.....' या सूत्राप्रमाणे नवख्यांचा वरचष्मा संघटनेवर भारी पडताना दिसत आहे. परळी वैजनाथ येथे काही दिवसांपूर्वी अतिशय जीवतोड काम करणारे तालुकाप्रमुख व दोन पिढ्यापासून शिवसेनेची घट्ट नाळ असलेल्या घरातील कट्टर व कडवा शिवसैनिक अशी कमी वयातच ओळख निर्माण केलेल्या व्यंकटेश बाबुराव शिंदे या युवा कार्यकर्त्याला न्याय मिळण्याऐवजी हकालपट्टीची नामुष्की सहन करण्याची वेळ पक्षाने आणली आहे. त्यामुळे नेमकं पक्षात कोणाचं ऐकलं जातं ? निर्णय प्रक्रियेत कोण? मग सर्वसामान्य शिवसैनिकांचा वाली कोण? अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा