परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे संघटनेचे आवाहन

 आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी १९ रोजी मोर्चा




मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे संघटनेचे आवाहन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
          आशा व गटप्रवर्तक यांना मोबदला वाढीचा निर्णय घेण्यात आला मात्र जीआर काढण्यात आलेला नाही. या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यासाठी बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने 19 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
           महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांना मोबदला वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यात आशांना दरमहा रु. ७,००० (अक्षरी सात हजार रुपये) व गटप्रवर्तकांना दरमहा १०,००० (अक्षरी दहा हजार रुपये) अशी वाढ प्रस्तावीत केलेली आहे. परंतु शासनाने संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार जीआर काढलेला नाही. त्यामुळे बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने दिनांक १९/०१/२०२४ शुक्रवार रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जि.प.बीड येथे मोर्चा काढण्यात येणारआहे. हा मोर्चा दुपारी ठिक १:०० वाजता सिध्दीविनायक कॉम्पलेक्स येथुन निघुन आण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.बीड येथे येईल.
         १. आशा व गटप्रर्वतक मोबद्दला वाढीचा शासन जि.आर. त्वरीत काढण्यात यावा. २. शासनाने मान्य केलेला २००० हजार रुपये दिवाळी बोनस त्वरित देण्यात यावा. ३. गटप्रवर्तकांना घोषीत केलेली दरमहा १०,००० रुपये वाढ त्वरित देण्यात यावी. ४. आशांना घोषीत केलेली दरमहा ७,००० रुपये वाढ त्वरित देण्यात यावी. ५. आशा व गटप्रवर्तकांना केली जाणारी ऑनलाइन कामाची सक्ती कायमस्वरुपी बंद करण्यात यावी.६. गटप्रवर्तकांना आरोग्यवर्धिनीचे मासिक १५,०० रुपये देण्यात यावे.७. आशा व गटप्रवर्तकयांना संपकाळातील मोबदला अदा करण्यात यावा. ८. गेल्या ३ महिन्यापासुनचा आशा व गटप्रवर्तयांचा थकीत मोबदला त्वरित द्या. ९. दिव्यांग सर्वे केलेल्या आशांना त्वरीत मोबद्दला त्वरीत देण्यात यावा. या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.
        या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन मार्गदर्शकप्रा.बी.जी.खाडे, अध्यक्ष शिवाजी कुरे,कार्याध्यक्ष सुभाष डाके, सरचिटणीसकिरण सावजी कोषाध्यक्ष सुवर्णा रेवले,उपाध्यक्ष उषा खाडे अर्चना पांचाळ सहचिटणीस,वर्षा कोकाटे उर्मिला शेंडगे, सदस्य अनिता चाटे , रामकुंवर कोथींबीरे ,सविता होके  प्रशांत मस्के, निर्मला भागवत, छाया पोटभरे, उर्मिला जोगदंड, शेख शबाना, हेमा काळे, ओम पुरी ,भारती राख  सावित्रा कदम, उषा औसे ,आशा मुंडे,सलमा अन्सारी सुनिता होळंबे यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!