२६ व २७ जानेवारीला कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा

२६ व २७ जानेवारीला कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा





परळी (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा यंदा २६ व २७  जानेवारी रोजी सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.

कामगार मंत्री डॉ.सुरेश (भाऊ) खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दिली आहे. इच्छुक कुस्तीगिरांनी २२ जानेवारीपर्यंत मंडळाच्या ललित कला भवन, १०६, वसंतदादा औद्योगिक वसाहत, यांत्रिक सुविधा केंद्र, चारुभाई शहा सांस्कृतिक संकुल, ता.जि.सांगली येथे प्रवेशिका सादर कराव्यात. स्पर्धेच्या प्रवेशिका, नियमावली यांची माहिती मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत. जिल्हा क्रीडा संकुल, सांगली-मिरज रोड, कृपामाई हॉस्पिटलसमोर, सांगली येथे या स्पर्धा होतील. राज्य / राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे स्पर्धा होणार असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जातील.

कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकवणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रकमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.७५ हजार, द्वितीय पारितोषिक रु.५० हजार, तृतीय पारितोषिक रु.३५ हजार व उत्तेजनार्थ पारितोषिक रु.२० हजार आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.५१ हजार, द्वितीय पारितोषिक रु.३५ हजार, तृतीय पारितोषिक रु.२० हजार व उत्तेजनार्थ पारितोषिक रु.१० हजार आहे. तसेच विविध ५ वजनी गटात सामने होणार असून विजेत्यांना रु.२५ हजार ते १० हजारांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

-------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार