बल्लभनगरात मंगल कलश फेरीसह धार्मिक कार्यक्रमात घेतला सहभाग

 पंकजाताई मुंडेंनी परळीत रामभक्तांसमवेत पाहिला अयोध्येचा लाईव्ह सोहळा


बल्लभनगरात मंगल कलश फेरीसह धार्मिक कार्यक्रमात घेतला सहभाग


परळी वैजनाथ।दिनांक २२।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज शहरातील रामभक्तांसमवेत लाईव्ह पाहिला. सकाळी बल्लभनगर भागातील महिलांनी काढलेल्या मंगल कलश फेरी व धार्मिक कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.


   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठया हर्षोल्हासात व भक्तीमय वातावरणात झाली. या पार्श्वभूमीवर   शहरातील रामभक्तांसाठी आर्य वैश्य मंगल कार्यालयात या सोहळयाचे मोठया स्क्रिनवर लाईव्ह प्रक्षेपण ठेवण्यात आले होते, पंकजाताई मुंडे यांनी हा सोहळा सर्वासमवेत पाहिला. प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, मी अकरा वर्षाची असताना लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेत सामील झाले होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि मामा प्रमोद महाजन यांनी केलेल्या कारसेवेच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. 


मंगल कलश फेरीत सहभाग

-------------

बल्लभनगर भागात आज श्रीसाई मंदिरात संगीत भजन व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, पंकजाताई मुंडे यांनी यात सहभाग घेतला. महिलांनी काढलेल्या मंगल कलश फेरीची सुरवात त्यांनी केली. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांमध्ये मोठा उत्साह यावेळी पहायला मिळाला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !