_मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_

 अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : परळीच्या काळाराम मंदिरात व्याख्यान व धार्मिक उत्सव


_मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        येत्या २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असुन या पावनपर्वाच्या अनुषंगाने परळीच्या काळाराम मंदिरात व्याख्यान व धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'एक दिवस श्रीरामासाठी.. रामरक्षा देशासाठी' या न्यायाने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन श्री काळाराम संस्थानने केले आहे.

       मित्ती पौष शु.१२ शके १९४५ सोमवार, दि. २२/ ०१/२०२४ रोजी  अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.त्यानिमित्त श्री काळाराम मंदिर संस्थान, स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, अंबेवेस, परळी वैजनाथ, जि.बीड. येथे 'एक दिवस श्रीरामासाठी.. रामरक्षा देशासाठी' या विषयावर सकाळी ११:०० वा. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. श्याम महाराज नेरकर (एम.ए., नेट., पी.एच.डी.) (कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वै.) यांचे व्याख्यान होईल.दु.१२:०० वा.भीमरूपी स्तोत्र, हनुमान चालीसा व रामरक्षा-सामूहिक पठण ,दु. १२:३० वा. प्रभु श्रीराम यांची महाआरती दु.०१:०० वा.अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, सायं. ६:३० वा.भजन संध्या राधाकृष्ण भजनी मंडळ व अंबिका भजनी मंडळ, परळी वैजनाथ असे कार्यक्रम होणार आहेत. 

      देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रभु श्रीराम स्वागत व लोकोत्सव साजरा केला जाणार आहे.या ऐतिहासिक व राष्ट्रीय अस्मितेच्या पावन पर्वावर  आयोजित या उत्सवात भाविकभक्त ,धर्मप्रेमी ,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री. संस्थान काळाराम मंदिर अंबेवेस, परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !