परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठपुराव्यास यश

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एफ.एम.आकाशवाणी केंद्र अंबाजोगाईचे ऑनलाईन उदघाटन



सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठपुराव्यास यश


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

परळी-अंबाजोगाई परीसरातील नागरिकांकरिता आकाशवाणी केंद्र निर्मितीचे स्वप्न भारत देशाचे पंतप्रधान  श्री.नरेन्द्रजी मोदी यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.19 जाने.2024 रोजी ऑनलाईन उद्घघाटनाद्वारे करण्यात आले.यावेळी केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकूर,राज्यमंत्री डॉ.एल.मुरूगन यांची प्रमुख उपस्थिती होती.

 अंबाजोगाई येथील 10 किलोवॅट क्षमतेच्या आकाशवाणी एफ एम प्रसारण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सौ.नमिताताई मुंदडा,अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके,पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक श्री.अनिलकुमार पाटील,सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे व मान्यवरांची उपस्थिती होती.

  अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा(धा.) येथील भारत सरकारच्यावतीने बंद करण्यात आलेल्या उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्या जागेत आकाशवाणी केंद्र निर्मितीसाठी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे व त्यांच्या सहकार्यांच्यावतीने उपोषण तसेच सातत्याने मागणीद्वारे प्रसार भारती मंत्रालय,भारत सरकारकडे  पाठपुरावा करण्यात आला होता.

 केंद्रीय माहिती व प्रसारण माजी मंत्री श्री.प्रकाश जावडेकर,कृषीमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,खा.डॉ.प्रीतमताई मुंडे,खा.पुनमताई महाजन,खा.सुप्रियाताई सुळे,खा.रजनीताई पाटील,आ.नमिताताई मुंदडा व माजी आ.संजयभाऊ दौंड यांच्या माध्यमातून अंबाजोगाई एफ एम केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न व शिफारस पत्र प्रसार भारती मंत्रालय व संबंधित विभागास देण्यात आले होते.

   त्यानुसार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकुर तसेच प्रसारभारतीकडून  उच्चशक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्र पिंपळा(धा.) ता.अंबाजोगाई येथे एफएम केंद्र निर्मितीसाठी ड्राफ्ट प्लॅन मंजुर करण्यात आला त्याकरिता 9 कोटी 62 लक्ष रूपयाच्या प्रस्तावित निधीस मान्यता देण्यात आली होती.सन 2022 मध्ये भारत देशातील ईतर राज्यांसह महाराष्ट्रातील एकमेव अंबाजोगाई एफ एम केंद्रास मंजुरी मिळाली आहे.

  अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा(धा.) येथे 1991 साली सुरू झालेल्या उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्याद्वारे प्रसारीत होणारे नॅशनल व डी.डी.न्युज चॅनेल भारत सरकारच्या प्रसारण विभागाने बंद केली होती त्यामुळे याठिकाणी पायाभूत सुविधा,जागा तसेच आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध असल्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम व लोकल रेडीओ स्टेशन सुरू करून तांत्रिक दृष्टया लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच अशाप्रकारचे केंद्र सुरू केल्यास स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळून हक्काचे व्यासपीठ मिळेल व मराठवाडयातील बीड,लातूर,धाराशीव,

परभणी,नांदेड जिल्हयातील लाखो लोकांना व प्रवाशी पर्यटकांना एफ एम केंद्राद्वारे सादर होणा-या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल याकरिता तातडीने मान्यता देवून आकाशवाणी केंद्राचे एफ एम,तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे व त्यांच्या सहकार्यांच्यावतीने म.गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टो.21रोजी दुरदर्शन उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र पिंपळा(धा.) येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.यामागणीसाठी केलेल्या उपोषणाची दखल घेत मुंबई आकाशवाणी- दुरदर्शन केंद्राचे तत्कालिन अतिरिक्त महासंचालक श्री.राजेश जैन,श्री.नीरज अग्रवाल व पिंपळा(धा.) येथील केंद्राचे तत्कालीन उपसंचालक श्री.सदाशिव चापुले यांच्यावतीने तातडीने प्रस्ताव मंजुरीसाठी प्रसारभारती,दिल्ली यांच्याकडे पाठविला होता त्यानुसार बीड जिल्हयातील 91टक्के व 69 कि.मी.परीसरातील नागरिकांना आकाशवाणीद्वारे ऐकण्यासाठी अंबाजोगाई एफ एम केंद्र निर्मितीचे उद्घाटक पंतप्रधान ना.नरेन्द्रजी मोदी तसेच मंजुरी व निधी देण्यात आल्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकुर,राज्य मंत्री डॉ.एल.मुरूगन,माजी मंत्री श्री.प्रकाश जावडेकर,कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे,खा.डॉ.प्रीतमताई मुंडे,खा.सुप्रियाताई सुळे,खा.पुनमताई महाजन,खा.रजनीताई पाटील,आ.नमिताताई मुंदडा व माजी आमदार संजयभाऊ दौंड,मुंबई आकाशवाणी-दुरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक नंदिणी दुर्गेश,उप महानिर्देशक श्री.गडपाले,तत्कालीन उपसंचालक सदाशिव चापुले यांच्यासह प्रसारभारतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदांचे परळी-अंबाजोगाई व परीसरातील नागरिकांच्यावतीने चेतन सौंदळे व त्यांच्या सहका-यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत तसेच एफ एम निर्मिती करिता योगदान देणारे अंबाजोगाई येथील श्री.विशाल अकाते,श्री.अविनाश तळणीकर,परळी न.प.चे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,नगरसेवक श्री.चंदुलाल बियाणी,शिवसेना नेते राजाभैय्या पांडे,मनसे पर्यावरण सेनेचे राज्य चिटणीस श्रीकांत पाथरकर,माजी नगरसेवक सोमनाथ निलंगे,रवीन्द्र परदेशी,शिवसेना नेते भोजराज पालीवाल,वैद्यनाथ बँकेचे संचालक,श्री.नारायण सातपुते,परळी रा.काँ.सरचिटणीस अनंत इंगळे,मनसे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर,अ‍ॅड.मनजीत सुगरे,चंदूअण्णा हालगे,मकरंद नरवणे,अ.भा.वारकरी मंडळ मराठवाडा विभागाचे अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे,दयानंद चौधरी,उमेश गुप्ता,संतोष पंचाक्षरी,सतीश चौधरी,शिरीष सलगरे,रमेश चौधरी सर,राजेश कांकरिया,संदीप टाक,रमाकांत बुरांडे,मनोज मानधणे,मनोज नरवणे,संतोष चौधरी,अनिल मिसाळ,नितीन पिंपळे,प्रकाश कस्तुरे,आत्माराम खंदारकर,बाळू गिरवलकर,महेश घेवारे,विराज धीमधीमे,हारूण शेख,धनंजय गाढवे,सुमीत कलशेट्टे यांच्यासह पत्रकार बांधवांनी एफएम निर्मितीसाठी उपोषणात सहभाग घेऊन सक्रीय पाठिंबा दिला होता.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!